mjare

प्रेम करावे तर असे..........एक प्रियकर...M.Jare.....♥

मी तिला शोधत होते...
ती आज दिसलीच नाही...
ती कॉलेजलाच आली नव्हती कारण.....
कुणालाच माहित नव्हतं.!
सारे आपापसात कुजबुजत होते...

स्पष्ट कुणीही बोलत नव्हते...!
हो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कला
गुनातही..!

सौंदर्य अतिशय सोज्वळ ,सडपातळ गोरी....
अतिशय देखणी राहणीमान अतिशय
साधे,आजच्या युगाला न पटणारे तरीही आकर्षक....

कुणीही प्रेमात पाडवा अशी..!
नाव तीच "राजश्री"
आम्ही तिला" राज" म्हणायचो...
" राज" म्हणजे "गाणं"...!
हि तिची ओळख गाणं हे तीच वेडंच...
गाण्यासाठी ती वेडी होती...
तिच्या गळ्यात जणू कोकिळेचा वास होता ...

ती गायला लागली कि सारे मंत्रमुग्ध झालेच समजा...

त्यातली मी पण एक ........!

मी पहिल्यांदा तीच गण ऐकलं...
"जीवलगा राहिले दूर घर माझे...........
"आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत.................!
पण.........
हे की आज ती कॉलेजमध्ये नाही ,tution
मधेही नाही, घरीपण नाही ,........आणि कुणी काही सांगतही नाही ......

तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली..

मी धावतच जाऊन विचारले अग राज कुठे आहे..?

कुठे दिसत नाही...!
ती रडतच बोलली हॉस्पिटल मध्ये भर्ती आहे....

मला अचानक काही सुचेनासं झालं....
कालपर्यंत जी धडधाकट मुलगी
माझासोबत होती ती अचानक हॉस्पिटल मध्ये....

तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात...
ती पुढे बोलू लागली.....माझा पायाखालची वाळूच सरकली...
राज सारखी सहनशील मुलगी असा काही करू शकते..?
विश्वासच बसत नव्हता,मग अचानक की झालं..?
ती कुणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा
बोलताबोलता तीने माझा जवळ आपला मन हलका
करण्याचा प्रयत्न केला.....
ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती...

तो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचा होता....

एक वर्ग समोर होता पण क्षेत्र एकाच होतं ....
ती बर्याच कार्यक्रमात गायची प्रत्येक स्पर्धा कॉलेज चे प्रोग्राम राज शिवाय अधुरे
असायचे...

गाण्यासाठी साथीला वादक लागयचे....आणि अशातच त्याची ओळख झाली..

तो वादक होतं ,प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती...

त्याला सगळे allroundar म्हणायचे...
तो बर्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका ,गायका सोबत वाजवायचा....

पण राज चा गाणं तो अतिशय जीव लाऊन वाजवायचा कारण ती
गायचीच भन्नाट..............
तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारा
असायचं...

तो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार
ड्रमर होता....
मुली पटकन त्याचावर इम्प्रेस व्हायच्या...

या सार्या गोष्टींचा त्याला खूप घमंड होता....

तो खूप गर्विष्ट होता हे....
त्याचा वागण्यातून जाणवायचं....
हे तिलाही माहित होता....
पण म्हणतात ना मना समोर कुणाच चालत नसता....!
नाव त्याच विशाल.....
मन अगदी अविशाल.........
उद्धट, गर्विष्ट, चिडचिडा असा त्याचा स्वभाव...

दिसायला मात्र एकदम आकर्षक....
एकदा कुणी पहाव आणि प्रेमातच पाडाव
असा...
पडली प्रेमात...
म्हणतात ना कि प्रेम आंधळा असता "पण हि तर पूर्णतः अपंगच झाली त्याचा
प्रेमात...
"वेडी".........
जसजशी त्याची ओळख वाढत गेली,,तसतशी हिची ओढही वाढत गेली तो मात्र .........

सारं समजून.....बाहेर गावी बरेचदा कार्यक्रमाला मिळून जायचे..
बाकी युनिट पण असायचं सोबत ...
हि मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची...
"विशाल म्हणजे माझं जीवन "असा ती म्हणायाची...

तो जेवला कि नाही..?
त्याला बारा वाटत कि नाही..?
त्याला काय पाहिजे काय नाही..?
ह्या सगळ्या गोष्टीची काळजी तिचं करायची....

पण त्याला हे सारं आवडायचा नाही म्हणायचं "रीआज कर" उगाच
वेळ घालू नको " तिच्या डोळ्यातला त्याचसाठी
असणारा प्रेम सर्वाना दिसायचं....
पण..!
हा तर पाषाण याला कधी पाझारच फुटला नाही....
कित्येकदा तिच्यावर चिडायचा पण हि मात्र प्रेमदिवानी कधी उलट उत्तरही देत नसे...
तिचा मन कितेकदा दुखावल्या जाई...
ती कधीही बोलून दाखवत नसे...
दुखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येई.....

राजने नेहमी विशाल वर निर्मळ निस्वार्थी
कशाचीही अपेक्षा ना ठेवता प्रेम केलं...देन...देन...आणि देनच प्रेम असू शकतं...
असा ती म्हणायची....
एकदा तरी माझा प्रेम या पाषाणाला पाझर फोडेल या आशेने ती नेहमी त्याचावर प्रेम करीत राहिली अचानक तिला समजला तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चालला .....

खूप रात्र झाली होती...

ती दुसर्या दिवसाची वाट पाहू लागली .....
पूर्ण रात्र रडून काढली तिने.....
त्याचापासून दूर...?
हि कल्पनाही सहन करू शकली नाही.....
एकदाची सकाळ झाली ती कॉलेजला आली डोळे सुजलेलेच दिसत होते ......
की झाले रा.............?
विचारण्याच्या आताच ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली ...........
माझा लक्षात आला ती विशाल ला शोधत होती तेवढ्यात तो समोरून येताना दिसला..

"थांब विशाल मला काही बोलायचं आहे,
तुझाशी तुझा आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला आज" ती बोलली......
डोळे पाणावलेले होते....
मला सोडून जाऊ नको रे..!
मी खूप प्रेम करते तुझावर...!!
जीवापाड...!
मी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन..!
पण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार,तुझाशिवाय मला समजून घे माझा प्रेमाला..!
माझा मनाला..!
समजून घे......"
एका श्वासात तिने आपल्या मनातील लाव्हा खाली केला....
आणि तो मात्र स्तब्ध..शांत...त्याला काही सुचेनासं झालं ......
तो शांत स्वरात बोलू लागला "हे बघ राज मी तुझ्या भावना समजू शकतो...
मला तुला दुखवायचं नाही होता...

पण मी तुझा कडे या नजरेने पाहूच शकत नाही...

प्रेम करणे तर दूरच विचारही करू शकत नाही... अग वेडे...!
कारण प्रेम एकदाच केला जाता आणि ते मी करून,चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं
आहे...
ती खूप दूर आहे माझापासून तरीही...!

तू खूप गुणी,खूप चांगली मुलगी आहेस,हुशार आहेस..!
तुझाजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे... तुझा आवाज तुझा गाणं...!
आपल्या कलेच चीज कर आपला आयुष सुंदर घडव..........!
हा विचार डोक्यातून काढून टाक.....
तू मला समजून घे व मला माफ कर .....
एवढा बोलून तो तेथून निघून गेला....
तो नेहमीसाठीच....
हि वेडी हो वेडीच...!

त्याचा शब्दातला अर्थ समजू शकली नाही...
आणि एक निर्णय घेतला मनाशीच......आणि आज ती हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत होती....

वाटला परत दोन गालात द्याव्यात....
कुणी आयुष्यातून गेला म्हणून आयुष संपता काय विचारावं..?
पण कोणत्याही प्रश्नाचा उउतातर ती देऊ शकत
नव्हती कारण आज तिचं एक प्रश्न बनून बसली
होती......
तिला बघतच ओक्साबोक्शी रडावसं वाटला.....
कसातरी मन आवरून बाहेर आले.......
काही दिवसांनी तिची प्रकृतीत सुधारणा झाली.....
रीआज पूर्ण बंद झालं होता गाणं गाने तर दूर एकातही नव्हती.....
पाषाण मूर्ती बनली जणू..!
काहीतरी शून्यात शोधत असायची कितीतरी वेळ बाहेर पाळण्यावर बसून..........
एक मात्र आजही कुणालाच माहित नाही माझाशिवाय कि तिने झोपेच्या
गोळ्या का खल्यात..?
परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असा केला साऱ्यांनाच वाटत......
मी पण तिला नको बोलू कुणाजवळ असा वाचन घेतला........

आता बरीच महिने झालीत ती बर्यापैकी
नॉर्मल आहे रीआज सुरु केलं..
गाणं सुरु केलं....
राज स्वताला सावरायला शिकली आता...!
आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते.......
आज तिच्या चंचल ,रोमांटिक गाण्याची
जागा संथ ,दर्दी...
हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे.....
गाताना आजही ती त्याला वादकाच्या
जागी शोधते......
पण,
तो तेथे नसतो तिच्या,
चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असतं पण,
त्याचा मगच दुख ........
माझाशिवाय जास्त कुणाला कळणार.....

"राज" ला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते माझे डोळे आपोआपच पाणावतात
आणि मनातून शब्द ओठांवर येतात
"प्रेम करावं तर राज सारखा...
End....

_▄▄_
(●_●)
╚═► =>
एक प्रियकर...M.Jare.....♥
               【९६०४६७२०७४】
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥