mjare

महादेव नाव होत त्याच... एक प्रियकर...M.Jare.....♥

लग्नानंतर आयुष्यात आलेला पहिला मुलगा... वयाने लहान पण मनाने,आणि बुद्धीने खूप मोठा होता...
त्याच्याशी बोलताना परकेपणा कधीच वाटला नाही....
नेहमी तो माझ्याजवळचा वाटायचा....
कधी कधी तर अस
वाटायचं कि विवेक ऐवजी हाच जर माझ्या आयुष्यात
आला असता तर…..
पण म्हणतात ना नियतीने,
सर्वांच्या गाठी बांधलेल्या असतात तसच काही झाल असाव....
त्याचा फोटो मागूनही त्याने
कधी पाठवला नाही, तो नेहमी म्हणायचं कि माणसाची प्रतिमा त्याच्या बोलण्यातून प्रकट होते....

अस समज,
कि तू आंधळी आहेस आणि तुला एक
शिल्पकृती बनवायची आहे....

मी खूप प्रयत्न,
केला त्याची प्रतिकृती बनवण्याचा पण
मनासारखी जमलीच नाही...
एका एकदम सामान्य मुलाची मुर्त्य(मुर्ती) माझ्या हातून घडली....
अस वाटलं त्याच्या चेह-यातून मुख्यतः त्याच्या डोळ्यातून त्याच्या मनातले सर्व भाव प्रकट होतात...
जणू काही त्याचे डोळेच माझ्याशी मूक संवाद साधत आहेत....
एकदा त्याने फोन केला आणि माझ्या आवडीचे कलर
विचारले, मी तपकिरी आणि क्रीम कलर सांगितले...
त्याने त्या दिवशी तपकिरी कलरचा शर्ट आणि क्रीम
कलरची पॅन्ट घेतली....

मग,
माझ्या मनातल्या आकृतीलाही मी तेच वस्त्र चढवले...
खूप गोड दिसत होता तो....
कधी मोटार सायकलवर बसून
मला फिरवताना, कधी पावसाच्या सरींपासून एकाच
छत्रीतून स्वतःचा बचाव करताना दिसायचा...

त्याच्याबरोबर फिरताना अस वाटायचं कि हा प्रवास,
कधीच संपू नये....
आणि लवकर तो सत्यात उतरावा....
1 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाला chating लिंग वरून सेलिब्रेट केलेला तो वाढदिवस मी कधीच विसरू
शकत नाही...

ज्या अपेक्षा मी विवेक कडून,
केल्या होत्या त्या सर्व त्याने पूर्ण केल्या...
माझ्याकडून कशाचीही अपेक्षा न करता ……! कस जमत रे तुला हे....

माझा नवरासुद्धा काही न काही तर,
शारीरिक सुखाची अपेक्षा करतो, पण तू मात्र फक्त देत
गेलास अमाप सुख , ज्यात मी पूर्णपणे न्हाऊन निघाले....
Orkut मधाळ तुझ नाव …..मनापासून..!
तुझ प्रोफिले खूप,
आवडल आणि तुला मैत्रीसाठी विचारलं...
वाटलं होत सर्व,
मुलांप्रमाणे तुही बोलशील काय करतेस...? नाव काय...?
राहायला कुठे...?
BF आहे का..?
फोन no.दे....?

पण तू,
यातला एकही प्रश्न विचारला नाहीस....
तुझा पहिलाच,
प्रश्न मनाला स्पर्शून गेला कधी कुणावर प्रेम केल आहेस का...?
या प्रश्नाने,
माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली सर्व पाने
उलगडली गेली....
पण खूप विचारांती ठरवलं,
कि इतक्या लवकर याला काही सांगायचं नाही....
स्वतःची personal life अशी कुणाबरोबर शेयर करायची नाही....

मी तुला काहीच नाही सांगितलं....
घरी आई,वडील आणि भाउ यांच्याबरोबर राहते....
स्वतःची स्वतंत्र रुम आहे, कॉम्पुटर इंजिनीयरींग करते,सर्व खोट सांगितलं....

तास न तास तुझ्याशी chating,
करायचे पण तुला काही खर सांगितलं नाही.... तीन दिवसांच्या बोलण्याने तू मला पूर्ण जिंकलास...
अशा स्वभावाचा मुलगा मी आजपर्यंत,
कधी बघितला नव्हता....

तुझ्याशी chatting
करताना रोहन, राज यांच्याशीही बोलायचे पण त्यांच
बोलण आणि तुझ बोलण यात कितीतरी फरक होता...
जगापेक्षा कितीतरी वेगळा होतास....
तुला फसवण,
मला जमलच नाही रे....
काय अशी जादू केलीस कोण जाणे,
पण चौथ्या दिवशी ठरवलं तुला सर्व काही खर
सांगायचं....
तसा scrap तुला केला, माझ लग्न होऊन 3
वर्ष झालेत....
मी माझ्या नव-याबरोबर
दिल्लीला राहते....
हे सर्व ऐकून तू माझ्याशी मैत्री ठेवणार नाहीस, नको ठेउस, bye....
एवढाच scrap होता तो.....
पण तुही तितकाच शांत reply दिलास....

लग्न हे एक बंधन आहे, त्यात तू अडकली आहेस...
पण तुझ मन अजूनही प्रेमासाठी आसुसलेल आहे शारीरिक,
नाही तर मानसिक...
मी ठरवलं होत,
कि तुला काही reply द्यायचा नाही....
या आधी मी ब-याच जणांना अस सांगितल होत पण कोणी मला reply
केला नाही....

खोटारडी म्हणून माझा अपमान केला....
पण,
कोणी माझ्या मनात उतरून बघितलं
नाही कि मी का अस वागते...?

पण तू मात्र बरोबर ओळखलस....
मनकवडा आहेस कि काय रे...?
पूर्ण जिंकलस रे,मला तू पूर्ण जिंकलस... ठरवलं, कि तुला सर्व सांगायचं...
College मध्ये असताना विवेकशी प्रेम झाल..
जातीच्या कारणामुळे पळून जाऊन कोर्टात लग्न केल....
विवेक ऑबेरॉय च्या ‘साथिया ’ फिल्म सारख
शेवटी घरी कळल्यावर आम्ही गाजियाबादला flat घेऊन
राहायला लागलो.....

सुरुवातीचे दिवस खूप सुखात गेले...
विवेकाने फक्त चंद्र तारे तोडून ते माझ्यावर उधळायचे,
बाकी ठेवले होते...

इतके सुख त्याने मला दिले...
पण,
काही दिवसातच ग्रहणाचे काळे ढग आकाशात
दिसायला लागले ते माझ्या सासुबाईंच्या रूपाने....
तिला मी सून म्हणून मान्य नव्हते.....

पण,
विवेकसमोर
त्या काही बोलायच्या नाही....
पण,
तो ऑफ़िसला गेल्यावर मात्र बारा तास मला टोमणे,सहन करायला लागायचे....

तो थकून यायचा म्हणून,
मी त्याला काही न सांगता सहन करत होते... पण,
एकदा सहन करण्याची क्षमता संपली आणि त्याला सर्व,
काही सांगितलं....

आश्चर्य म्हणजे त्याने
त्याच्या आईची बाजू घेतली....
तेव्हा मी 2 महिन्यांची pregnant होते... भांडणामध्ये त्याने
मला ढकललं आणि मी किचनच्या ओट्यावर पोटाशी पडले....
हा माझा पहिला miscourage....
सासूबाई सर्व बघत,
होत्या पण काही बोलल्या नाही...

त्यानंतरही एका वर्षाने असाच झाल
तेव्हा मी जमिनीवर पडले तो दुसरा miscourage....
मला काही कळायचं नाही कि काय कराव आई
वडिलांकडे जायला तोंड
नव्हत.....
सर्कशितल्या वाघासारखी माझी अवस्था झाली
होती...
नंतर मी काही बोलायचे नाही....
सासूबाई,
लखनऊला निघून गेल्या आणि सर्व त्रास कमी झाला....
पण,
विवेकबद्दल असलेल प्रेम कितीतरी पटींनी कमी झाल....
ज्या मुलासाठी मी स्वतःच्या आई वडिलांचा विचार न
करता घरातून पळून आले....

त्याने माझा जराही विचार करु नये...? दिवसभर घरात बसून कंटाळा यायचा मग
टाईमपास म्हणून orkut वर एक फ़ेक अकाऊंट उघडल,
आणि सहज म्हणून मुलांसोबत टाईमपास
करायचा मजा यायची सर्वांना छळताना, मी chat
करताना त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचायची खूप
खेळायचे त्यांच्या मनाशी, आणि मग
कंटाळा आला कि त्याला सांगायचं माझ लग्न झाल आहे...
तो मुलगा आपोआप बोलायचं बंद करायचा... पण तू तस,
काही केल नाहीस....

बाकीच्यांना कळाल कि माझ लग्न
झालेलं आहे, तर कधी मला विचारायचे
नाही कि तो कसा आहे...?
काय करतो...?
पण तू मात्र,मला त्याच्याविषयी सर्व विचारलास
मलाही तुझ्यापासून काहीही लपवता आल नाही...

जी गोष्ट मी आजपर्यंत माझ्या मित्र -मैत्रीणीना आई
-वडिलांना देखील नाही सांगितली ती सर्व
तुला सांगितली तुझ्याशी बोलताना वेळ कसा निघून,
जायचा कळायचं सुद्धा नाही....
त्या दिवशी पहिल्यांदा तू call केलास,
पहिल्यांदा मी तुझा आवाज ऐकत होते...
तुझ्या बोलण्याकडे माझ लक्षच नव्हत, तुझी मधाळ,
वाणी, बोलण्यातला अदबशिरपणा, नम्रता यातच
मी गुंग झाले....
गमतीने तुला विचारलं कि तू गायक आहेस
का...?
माझ्या सात पिड्यांपासून एकही गायक
आमच्या घरात जन्मला नाही हे तुझ उत्तर, मग
chatting करतानाही तुझा आवाज ऐकत आहे...
अस वाटायचं....
3 महिने झाले आपल्या मैत्रीला मी तुझे सर्व
उपदेश पाळण्याचा प्रयत्न करत होते....

दर मंगळवारी तू
माझ्यासाठी प्रार्थना करायचास,
स्वतःसाठी का नाही मागितलास रे...?
का आम्हालाच भरभरून दिल...?
तू नेहमी म्हणायचास कि everything
will be all right देव सर्व काही ठीक करेल..
तो माझी प्रार्थना जरूर पूर्ण करेन...
विवेक
आणि मी काही दिवसांसाठी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा,तुझ्याशी निट
बोलताच आल नाही....

कधी जाऊन तुझ्याशी बोलते अस
वाटत होत....
पाच दिवसांनी गाजीयाबादला आलो,
मी सतत विवेकची ऑफ़िसमध्ये जाण्याची वाट बघत होते...
त्याने जसा घराच्या बाहेर पाय ठेवला तसच,
विजेच्या वेगाने येऊन कॉम्पुटर चालू,
केला आणि आश्चर्याचा धक्का बसला तुझा एकही scrap
नव्हता....

तुला call करण्याचा प्रयत्न केला पण,
तोही लागत नव्हता मी खूप वेळ विचार केला मग म्हटलं,
मी इथे नसल्याने तू scrap केला नसशील... तुला scrap पाठवले SMS केले पण काही उत्तर मिळाले नाही...
एवढा राग येतो तुला माहित नव्हत कारण गेल्या 3,महिन्यात एकदाही रागावला नाहीस आणि आज मात्र
एकदम नातच तोडून टाकल्यासारख वागत होतास.....
2 दिवस मी वाट बघितली कॉम्पुटर समोर बसून...
तुझ्या online येण्याची वाट बघत होते पण तू online
आला नाहीस....

तुझा एकही reply आला नाही....
मग मात्र खूप बावरले काय घडल काहीच कळत नव्हत....
अचानक आठवण आली कि email च account open करून बघाव...
त्यात तुझा mail
बघितला आणि अधाशासारखी वाचायला सुरुवात केली
Dear मेघा,,,,

माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले क्षण मी तुझ्यासोबत,
घालवले....
हे क्षण मी माझ्या मनाच्या कप्प्यात बंदिस्त
करून ठेवले आहेत...
ते फक्त माझे आहेत...
त्याच्यावर कुणाचा हक़्क़ नाही....
आता मी जे काही तुला सांगणार
आहे...
त्यावर कदाचित तुझा विश्वास बसणार नाही.... पण,
दुर्दैवाने हे सर्व खर आहे...

मी इंजिनीयरींग स्टुडन्ट आहे,
मुंबईला राहतो हे सर्व खर आहे....

पण,
मी कुठलाही part time job करत नाही, माझे वडील watchman नाहीत,
आई दुसर्यांच्या घरी धुणी भांडी करत नाही....

तू जस,मला सांगितलं होतस कि तू अविवाहित आहेस तसच,
मी तुझ्याशी खोट बोललो यासाठी मला माफ कर...
am really sorry for that...
माझे वडील import-export चा buisiness करतात, आई cardiologist आहे...
एक वर्षापासून मला blood cancer आहे,
आणि तुला माहीतच असेल कि यावर काही इलाज नाही....
माझंही तेच झाल आहे....
orkut वरच्या कुठल्याही मित्राला मैत्रिणीला हे माहित नाही...

तुझ्याप्रमाणे माझही हे फ़ेक अकाऊंट आहे..
आणि यातले सगळे मित्र अनोळखी आहेत... पण,
तुझ्याशी मैत्री पलीकडच नात निर्माण झाल त्यामुळे
तुझ्यापासून मी काहीही लपऊ शकत
नाही....

जेव्हा मी तुला सांगायचो कि मी job
ला जातोय तेव्हा मी आईबरोबर दवाखान्यात जायचो...
तिने प्रॅक्टीस बंद केली आणि पूर्ण वेळ मला देते
माझ्या देखभालीसाठी....

ज्या दिवशी मला cancer
असल्याच कळल त्या दिवशी दोघांवरही आभाळ कोसळल...
आमच्या हसत्या खेळत्या घराला कोणाचीतरी नजर,
लागल्यासारख झाल....
खूप इलाज केले पण काही झाल,
नाही, मंत्र -तंत्र, उपास -तपास, नवस सर्व
काही झाल पण काही उपयोग झाला नाही... माझ्या खूप,
जवळच्या मित्रांनाच हे माहित आहे....
मला कॉलेज मध्ये,
जायला बंदी केली म्हणून मीही घरीच orkut वर नवीन
friend बनवण त्यांच्याशी गप्पा मारणे यात वेळ
घालवायला लागलो...

तू ज्या दिवशी मला mail
केला कि, I want to do sex with you तेव्हाच
मला कळल कि काहीतरी प्रोब्लेम नक्कीच आहे आणि तूच
मला खर काय ते सांगशील आणि तसच घडल...
त्या दिवसापासून दररोज बाप्पाजवळ
प्रार्थना करायचो कि सर्व काही ठीक होऊ दे...

तुझ्या miscorage बद्दल वाचून तर अंगावर काटाच
आला....
doctor ने तुला सांगितलं होत कि परत तू
conceive नाही करू शकणार पण माझा देवावर पूर्ण
विश्वास होता दर मंगळवारी बाप्पाकडे
तुझ्यासाठी प्रार्थना करायचो...
तू दिल्लीला जात आहेस पण मला मात्र करमणार
नाही आणि आजकाल मलापण त्रास खूप होतोय....
आई,जास्त वेळ कॉम्पुटर समोर बसू देत नाही...

म्हणून तुला सर्व काही सांगतोय,काही दिवसांनी कदाचित,
मी या जगात नसेन पण देवाजवळ एवढीच
प्रार्थना करतो कि, तू कुठेही राहा पण सुखात राहा...
विवेकच तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होऊ नये आणि तुझ
त्याच्यावरच....

जर तुम्ही दोघे मनाने एकत्र आले तर
सर्वात जास्त आनंद मलाच होईल, आणि मला माहित आहे...
कि हे लवकरच होईल, आणि तुझ्या pregnancy चा एक
mail माझ्या inbox मध्ये पडला असेल....

काय माहित
मी असेन का नसेन…..एक प्रार्थना जरूर करेन
माझ्यासाठी कि जर मी या जगातून गेलो तरी पुनर्जन्म घेऊन तुझ आणि विवेकच बाळ म्हणून या जगात परत पाउल
ठेवेन...

सर्व काही ठीक होईल, देवावर विश्वास ठेव
आणि हो काळजी घे स्वतःची,विवेकाची आणि होणा-
या बाळाची...
फक्त तुझाच मनापासून (मनु )
Mail वाचून एकदम shock झाले...

मन अगदी सुन्न झाले...
सुमती क्षेत्रामाडेंची ‘युगंधरा ’ वाचल्यानंतर
झाल अगदी तसं...

तुला call करायचा प्रयत्न केला,पण
तुमसे मिलके ऐसा लागा,
तुमसे मिलके,
आरमा हुये पुरे दिलके,
ऐ मेरी जाने वफा,
तेरी मेरी मेरी तेरी
एक जान हैं...
साथ तेरे रहेंगे सदा……..
हि callertune नुसतीच वाजत राहिली ,रोज
तुला SMS, scrap करते पण उत्तर कधीच येत नाही...
आज 3 महिन्यांनी तुला mail करते आहे....

खरच,
तुझ्या प्रार्थनेत खूप,
शक्ती आहे ,ज्या ठिकाणी डॉक्टरांनी आशा सोडली होती
तिथे,
तुझ्या प्रार्थनेमुळे चमत्कार घडला...
आज तुला सांगावास,
वाटत कि मी pregnant आहे...

जेव्हा विवेकला कळल,
तेव्हा त्याने मला उचलून गिरकीच घेतली पण मला तू
हवा होतास त्या ठिकाणी....

काय माहित का पण तू,
सांगितल्याप्रमाणे मी त्याच्याशी चांगल वागतेय
आणि तोही खूप चांगला वागतोय माझ्याशी... खूप,
काळजी घेतोय माझी.....
तू स्वतःसाठी का नाही प्रार्थना केलीस …..
का नाही...?
माझ्या पोटात वाढणार बाळ तुझ्या रूपात नाही याव हीच प्रार्थना देवाजवळ करते....

माझ आयुष्य तुला लाभू दे....
मनापासून फक्त तुलाच...

End....
_▄▄_
(●_●)
╚═► =>
एक प्रियकर...M.Jare.....♥
               【९६०४६७२०७४】
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

हिंदु नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा ...आपणांस व परिवारास हे नववर्ष सुख समृद्धी व आनंदाने जावाे ह्या मंगलमय शुभेच्छा
---

shraddh@

Superb story 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌