mjare

आज ते दोघेही खुश होते....असणारंच
ना?....कारण आज ते खूप दिवसांनी
एकमेकांना भेटणार होते.
भेटायचे म्हणून आज ती केस मोकळेच सोडून
आली होती....कारण त्याला आवडायचे
तिचे मोकळे सोडलेले केस.
त्याला ती जशी आहे तशी आवडायची
म्हणून ती सुद्धा तशीच आली होती.....न
नटता थटता...एकदम साधी...
त्याने तिला लांबूनच येताना पहिले.
दोघांनाही एकदम आनंदाचे झरे फुटले.....
दोघेही बीचवर गेले बसायला....
दोघांनीही खूप गप्पा मारल्या....
समुद्रावर दोघेही जीव एकदम सुखात
बसले होते.
"अथांग सागराची लाट,
दोघांचे हातामध्ये हात,
डोळ्याच्या समईत स्वप्नांची वात,
स्पर्शाची उब अन....सोबत थंड वाऱ्याची
साथ"
मधेच तिच्या लक्षात आले कि,तो
तिच्याकडेच पाहत बसलाय....तिला
लाजायला झाले,
म्हणाली,
"ये जाणा.....माझ्याकडे का पाहतोयस
असा.....समोर बघ ना....समुद्र बघ कसा
फेसाळलाय....मस्त दिसतोय"
"अगं पण त्याच्यापेक्षा मी आता जो
पाहतोय तो समुद्र मस्त दिसतोय."
तिला अजून पाणी पाणी व्हायला
झालं....तरीही ती म्हणाली...."बस हा
बस झालं..."
तो म्हणाला,"ये ऐक ना....गोव्याचे
समुद्र कि नाही मस्त आहेत....शांत
एकदम....एकदम......"
"बस बस.....पुरे झाले "गोवा
पुराण"......गोव्याचे बीच असे
होते...गोव्याचेबीच तसे होते....." तिने
त्याचे वाक्य मधेच तोडले.
तो हिरमुसला बिचारा आणि
सांगितल्या प्रमाणे समोर समुद्राकडे
पाहू लागला.
तिच्या लक्षात आले ते आणि तिने
त्याच्या खांद्यावर डोके टेकवले...
म्हणाली,
"तुज्या खांद्यावर डोके ठेवले न कि
सगळा त्रास विसरायला होतो......खूप
खूप आयुष्य जगावसं वाटतं"
मग काय?......गेला त्याचा सगळा राग.....
ती मधेच शांत झाली,
"माझे बाबा नाही तयार होणार रे
आपल्या लग्नाला.....आपणथांबवू हे
सगळे...."
"अगं मी समजावेन त्यांना...त्यांना तुला
सुखातंच बघायचीय ना.....मी करेन
त्यांच्या सगळया इच्छा पूर्ण.जरूर
ऐकतील ते"
आणि तो तिला समजावून सांगू
लागला....सगळे ऐकून मग ती थोडी शांत
झाली....
तिला समजावून मग तो तिच्याकडे
थोडीशी पाठ करून बसला,
तिच्या लक्षात आले ते....तिने त्याची
हनुवटी धरून त्याचा चेहरा स्वतःकडे
फिरवला,
त्याचे डोळे पाणावलेले होते,
म्हणाली,"अरे रडतोस काय वेड्या.....काय
झाले?
म्हणाला,"काय नाही गं....खरंच तुजे
बाबा त्या नाही झाले तर?....हा
विचार करत होतो..तेव्हा जो एकटेपणा
वाटेल ना तो जाणवत होतो"
"अरे तू पण ना वेडा आहेस....मंद.....मी कुठे
जात नाहीयेय.....मी फक्त तुजीच
आहे....फक्त तुझीच"
असे बोलून तिने त्याच्या गालावर चुंबन
घेतले आणि म्हणाली,"माझे तुझ्यावर खूप
खूप खूप खूप.......खूप प्रेम आहे".
तो म्हणाला,
"काय म्हणालीस?मला ऐकायला नाही
आलं....कालपासूनकमी ऐकायला येतंय...
आणि
आता गालावर काय केलंस??????माझे
सगळे सेन्सर काल पासून बंद
पडलेयत...काही जाणवतच
नाहीयेय....पुन्हा कर बघू".
लाजली ती...म्हणाली..."हो
का?......बावळट....."....M.Jare..@9604672074..@

Smitul

Wow it's so awesome and romantic.... माझं आणि माझ्या प्रियकराचा हे नेहमीचं संभाषण आहे. आणि शेवट असाच गोडं होतो.

SONALI KARANDE

aj to majya sobat nahiye.. pn aamcha sambhashan sudha etkach romantic aani god asaycha....
junya premachi aathavan Karun dilyabaddal manapasun dhanyavad........

mjare


mjare

"प्लीज समजून घे प्लीज नको खेळू माझ्या जीवनाशी मी तर रोजचं रडलोय तुझी आठवण काढुन,तुझी आठवण आल्यावर अश्रू ओघळणे गरजेचे आहे का.आठवन हि प्रत्येकाची येते मला.पण प्रत्येकाच्या आठवणीत नाही न रडले जात.मग तुझ्याच आठवणीत मी का सारखा रडत असतो का कशासाठी.माझ्या साठी तू असशील तर तसे माझे मित्र मैत्रिणी.माझे आई वडील हि आहेत.त्या पेक्षा हि तू का जवळची वाटते.आज तू जवळ नाही म्हणून हि तू जवळ आहेस म्हणून..