ronydemelo

थेंब ही रडून ओला होतो
« on: December 28, 2016, 05:24:07 PM »
थेंब ही रडून ओला होतो जेव्हा तो माझ्या वर पडतो.....
मग मी कसा पावसात भिजू जेव्हा तुझ्या शिवाय पाऊस पडतो.......

फसवून जातात ढग सारे आभाळ मात्र काळच राहतं
तुझी वाट पाहण्यात ते स्वतःचा रंग विसरून जातं

साठून येत पाणी वाटेने....... पाय मात्र कोरडे राहतात...
आणि जेव्हा घरी यावं तेव्हा पावलांवर जखमा दिसतात...

एखादा थेम्ब मग छत्री मधून हळूच छातीवर कोसळतो....
आणि मग मी इतका भिजतो की तो तुला चिंब भिजवून माझ्या कडे खेचून घेतो