Ravi kadam

एकटेपणा
« on: May 24, 2017, 05:54:47 PM »
भरपूर जणांनी विचारला सारख तू एकटेपणावर लिहतोस... हा एकटेपणा म्हणझे नक्की काय.....तेव्हा मी त्याच्या शोधात निघालो....

एकटेपणा नक्की काय असतो..

व्याख्या शोधणं तस कठीणच..

कारण उत्तर बदलतात माणसांबरोबर....

कोणाला मित्र नाही म्हणून एकटा..

कोणी मित्रांच्या घोळक्यात एकटा..

कोणाला मुलांनी टाकलं म्हणून एकटा..

कोणाला मुल नाही म्हणून एकटा..

कोणाला परिवार नाही म्हणून एकटा..

कोणाला परिवाराने नाकारल म्हणून एकटा..

प्रत्येकासाठी व्याख्या वेगळी..

मात्र दुःख अगदीच सारख..

हृदयाला पिळवटून टाकणार..

वेदनेची तीव्रता कदाचित असेल कमी जास्त..

पण सल अगदी तशीच..

हळुवार मनात खुपणारी...

ज्याची त्यालाच कळणारी...

पण या जगात प्रत्येकजण एकटाच असतो..

कधी ना कधी तरी..

कुठल्या ना कुठल्या वाटेवर...

खर तर जन्मभरच...

एकटा येतो अन् एकटा जातो..

सोबत असते ती फक्तं स्वतःची...

अमर्त्य सत्य आहे...

सर्वाना माहित आहे...

पण अस सत्य जे...

समजून ना समजलेले..

कळून ना कळलेले...

म्हणूनच तर..

वर्षानुवर्षे...

जस सत्य अबाधित आहे...

तसा एकटेपणा ही...

बदलतात ती फक्तं माणस...

एकटेपणाच्या शोधात..हा एकटेपणा नावाचा माझा मित्र सापडलाच नाही...

पण एक खर सांगतो हल्ली नेहमीच असं होतं........ तुझी खुप आठ्वण येते... .....खास करुन एकटा असताना;
Ravi kadam 9011881373