छान वाटली कथा.. बरीच मोठी आहे पण वाचकाला गुंतवून ठेवणारी. नीता आणि अनिलची मैत्री खूप विलक्षण आहे. नीताने अनिलला केलेली शिक्षा जरी खूप कठोर असली तरी मैत्रीत असे नाजूक क्षण येतात आणि त्यावेळी ते धैर्याने व खंबीरपणाने हाताळणं गरजेचंही असतं. त्यामुळेच नीताला तिच्या अधिकाराची असलेली जाणीव आणि योग्य वेळी तिने त्या अधिकाराचा केलेला वापर खूप उचित वाटतो. अनिलनेही नीताच्या अधिकाराचा आदर केला आणि मिळालेली शिक्षा स्वीकारली ह्यातुन त्याची प्रगल्भताच दिसते. प्रत्येक नातं असंच प्रगल्भ असायला हवं.