Harishnaitam

नाते प्रितीचे असावे
« on: March 09, 2019, 10:36:09 PM »
नाते प्रितीचे  असावे...
●●●●●●●●●●●●

नाते तुझे अन् माझे असावे
ते रक्ताचे नसावे...
ते प्रित फुलांनी बहरून यावे
ते अपुले प्रित असावे ।

ते तुझे अन्  माझे स्वप्न असावे
त्याना साकार मीच करावे
तुच मला स्वप्नात दिसावे
ते तु अन् मीच असावे  ।

तुच माझ्या समोरुन यावे
येताना तुझे ते केस हलावे
अन्  सुगंध बहरुन यावे
ते स्मित तुझे असावे  ।

मन माझे तुझ्यात असावे
तु मज गगणात दिसावे
गगणा परी मन माझ फुलावे
ते फुलतांना तु माझीच असावे ।

  कवि :- हरिष डी. नैताम
  मु-पो. ठाणेगांव ता. आरमोरी जि.
  गडचिरोली 441208
  मो.न. 9834209927