Swapnil Dhobale

आतापर्यंत खूप स्वप्न पाहिली,
काही चांगली तर काही वाईट.
काही झोपेत तर काही जागेपणी,
काहींमध्ये तू होतीस तर
काहींमध्ये फक्त तूच होतीस
काही स्वप्न पूर्ण होतील,
काही फक्त आठवणीत राहतील
कालच एका मित्राने विचारलं
“क्या रे, बात होता है उससे अभी भी ?”
“होता है, कभी कभी,
वो तो चार दिन की चाँदनी है बस “
मीही हसत हसत उत्तरलो
“चार दिन रास्ता दिखाएगी
पाँचवे दिन अँधेरे में अकेला छोड़ जाएगी “
हे मात्र मनातल्या मनात
कधी कधी वाटतं
एवढी सारी स्वप्न पाहिली
प्रत्येक possibility imagine करून पहिली
यातलं एकतरी स्वप्न खरं व्हावं
अन आयुष्यही त्या ‘चारच’ दिवसांचं असाव
याउलट कधी कधी वाटतं
जी स्वप्न पहिली त्यापेक्षा वेगळ काही तरी घडावं
अनपेक्षित, ज्याची कधीच कल्पना केली नाही
अन कधी करूही शकणार नाही
एकमात्र खरं आहे कि,
तुझ्याशिवाय भविष्याची कल्पना
कधी करताच आली नाही
हा पण याचा अर्थ असं नाही कि,
मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही
कल्पना फक्त कधी करू शकलो नाही बस
बाकी, आजही वेड लावणारी स्वप्न बघतो मी
म्हणजे, घरातले सर्वजण झोपल्यावर
तुला propose करण्याची practice करण्यापासून
ते बाहेर कुठे फिरायला गेल्यावर
propose करण्याची जागा शोधेपर्यंत!
पण एक बदल झाला आहे आता
आजकाल मी ‘तुझ्यासाठी’ नाही तर
‘तुझ्यासोबत’ काय करावं याची स्वप्न बघतो
यातलं कदाचित एकही स्वप्न खरं होणार नाही
पण क्षणिक सुख मात्र देऊन जातील आणि
प्रत्येक वेळी तुझ्या प्रेमात पाडतील
Swapnil Mahadev Dhobale