Pallavi08

मॅक्रॉनी उपमा
« on: February 24, 2017, 12:43:21 PM »
मुलांना खाऊच्या डब्यात नेहमीच्या पोळीभाजीपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर हा मॅक्रोनी उपमा उत्तम पर्याय ठरू शकतो! हा उपमा अंदाजे २० मिनिटात तयार होतो.

साहित्य:
१ वाटी मॅक्रॉनी
३-४ वाट्या पाणी
१/२ वाटी कांदा
१ लहान टॉमेटो
१ते२ हिरव्या मिरच्या
१ चमचा तूप
१/४ चमचा जिरे
२ चिमटी हिंग
४-५ कढीपत्त्याची पाने
चवीपुरता मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

पाककृती:
  • ३-४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात.
  • ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार मॅक्रॉनी शिजवाव्यात.
  • चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणू निथळू द्यावे.
  • कढईत तूप गरम करावे. त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी.
  • त्यामध्ये कांदा घालून तो पारदर्शक होईस्तोवर परतावा, नंतर टॉमेटो घालून तो मऊसर होईपर्यंत परतून घ्यावा.
  • वरील मिश्रणात शिजवलेल्या मॅक्रॉनी घालाव्यात, चव पाहून आवश्यक वाटल्यास मीठ घालावे.
  • २ मिनिटे गरम करुन कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.
आणखी रेसिपीज साठी भेट द्या: https://goo.gl/uT62rC