Pallavi08

महाराष्ट्राची ओळख असणारी पारंपारिक ‘पुरणपोळी’ खवय्यांच्या मोठ्या लाडाची! सणासुदीला तर या पुरणपोळीचा मान फारच वधारतो. सणावाराला बनणा-या पारंपारिक पदार्थांच्या साहित्य व पाककृतीत थोडाफार बदल करुन एखादा नवीन पदार्थ बनविण्याची हौस असेल, तर खालील रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील! गणेशोत्सवाला विविध स्वादाचे मोदक, तर दिवाळीत अनेक प्रकारच्या करंज्या उपलब्ध असतात, त्याप्रमाणे आता हौशी सुगरणी बनवू शकतील नव्या चवीच्या पुरणपोळ्या!

१. रव्याची पुरणपोळी

साहित्य – पाव किलो बारीक रवा, पाव किलो चण्याची डाळ, पाव किलो गूळ, वेलची पूड, जायफळ पूड, सुंठ पावडर, साजूक तूप

पाककृती – चणा डाळ प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्यावी. वाफवलेल्या डाळीतून पाणी वेगळे करावे. नंतर कढईत गरम तूपामध्ये गूळ व डाळ एकत्र करुन शिजवून घ्यावी व गॅस बंद करुन तयार मिश्रणात वेलची पूड, जायफळ पूड आणि सुंठ पावडर घालून मिश्रण कोमट असतानाच पुरणपात्रात घालून त्याचे बारीक पुरण बनवावे.
आवरणासाठी- प्रथम रवा जराशा दुधासोबत मळून घ्यावा. तयार झालेला गोळा काहीवेळ झाकून ठेवावा. नंतर, त्याचे लहान लहान गोळे करुन त्यामध्ये तयार पुरण भरावे व साजूक तूपाच्या साहाय्याने पोळ्या लाटाव्यात. तव्यावर मंद आचेवर या पोळ्या खरपूस भाजाव्यात.

अधिक वाचा: https://goo.gl/jCIVUb