virat

स्वभावाला औषध असतं
« on: February 17, 2015, 06:23:20 PM »
स्वभावाला औषध असतं
पण ते रोज घ्यायच असतं..
अधिरातला अ सोडून
थोड धिरानं घ्यायच असतं
संतापातला ताप सोडून
मनाला संत करायच असतं
मनातला हट्ट सोडून
नात घट्ट करायच असतं
माझ्यातला मी सोडून
तीच्यातला मी ला जपायच असतं
आपलं बोलणं सोडून कधी
समोरच्याचही ऐकायच असतं
एकाच दिवशी नाही तरी
हळू हळू बदलायच असतं
थोडं थोडं जमल तरी
रोज प्रेम द्यायच असतं
स्वभावाला औषध असतं
पण ते रोज घ्यायच असतं