Chota Kavi

प्रेम : Prem marathi sms
« on: January 09, 2012, 10:38:48 PM »
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...

Chota Kavi

Re: प्रेम : Prem marathi sms
« Reply #1 on: January 11, 2012, 01:16:47 AM »
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही

Chota Kavi

Re: प्रेम : Prem marathi sms
« Reply #2 on: January 11, 2012, 01:17:01 AM »
त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही

Chota Kavi

Re: प्रेम : Prem marathi sms
« Reply #3 on: January 11, 2012, 01:17:16 AM »
मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते .....

Chota Kavi

Re: प्रेम : Prem marathi sms
« Reply #4 on: January 11, 2012, 01:17:35 AM »
एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे