Manasi

मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« on: October 10, 2009, 05:11:42 PM »
Wah marathi talent !!!!

Bill Gates organized an enormous session to recruit a new Chairman for Microsoft Europe. 5000 candidates assembled in a large room.
One particular candidate is our  Makrand.

Bill Gates: Thank you for coming.
“Those who do not know JAVA may leave the room...”
So immly 2000 people left the room.

Makrand says to himself,
'I do not know JAVA, but I have
nothing to lose if I stay. I'll give it a try !'

Bill Gates: Candidates who never had experience of managing more than 100 people may leave.
So immly  2000 people Left the room.


Makrand says to himself
'I never managed anybody by
myself, but I have nothing to lose if I stay. What can
happen to me ?' So he stays.


Bill Gates: Candidates who do not have management diplomas may
leave.
So immly 500 people Left the room.

Makrand says to himself,
'I left school at 15, but what
have I got to lose ?' So he stays in the room.

Finally,
Bill Gates asked the candidates who do not speak Serbo-Croat
to leave.

So immly 498 people left the room.

Makrand says to himself,
'I don’t even know to speak even any one word of Serbo-Croat

but what do I have to lose ?' So he stays
and finds himself with one other candidate; Everyone else
has gone.

Bill Gates joined them and said
'Apparently you are the only
two candidates who speak Serbo-Croat language, so I'd now like to
hear you people have a conversation together in that language.'

Calmly, Makrand turns to the other candidate and says 'Kothun Alas Re?'
The other candidate answers… ' Punyahun !!!!'

 
Funny Marathi JOKES

marathiadmin

मराठी विनोद
« Reply #1 on: January 05, 2012, 03:36:03 PM »
very nice !!
मी मराठी

Chota Kavi

Re: मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #2 on: January 05, 2012, 06:51:33 PM »
एक बाई दुसर्या बाईला विचारले

पहिली बाई : तुम्ही गहू
कसा आणला?

दुसरी बाई : पिशवीतून आणला.

पहिलीबाई : तसं नाही हो,
कोणत्या भावाने आणला?

दुसरी बाई : चुलत भावाने आणला.... :D :p

Chota Kavi

Re: मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #3 on: January 16, 2012, 07:47:33 PM »
झम्प्या-गम्प्या दोघे युद्धभूमीवर असतात. झम्प्या अंगावर मच्छरदाणी घेऊन लढायला निघतो.

गम्प्या : ओय...हे काय? बुलेटप्रूफ जॅकेट न घालता तू हे काय अंगावर चढवतोय?

झम्प्या : अरे यार...डोण्ट वरी... ज्यातून एक मच्छर आत घुसू शकत नाही त्यातून गोळी काय आत शिरणार?

Chota Kavi

Re: मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #4 on: January 16, 2012, 07:48:07 PM »
झम्प्या : अरे यार...आज मला एक एसएमएस आला आणि माझा सेलफोन लगेच स्विचऑफ झाला.

गम्प्या : काय सांगतोस...कोणता एसएमएस होता तो?

झम्प्या : बॅटरी लो

गम्प्या : वा...मग मला पण पाठव... आपण तो सगळ्यांना पाठवू आणि घाबरवू...

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #5 on: January 16, 2012, 07:49:43 PM »
एक चित्ता सिगारेट ओढत होता !
१ उंदीर म्हणाला -"माझ्या बंधू सोड हि नशा , माझ्या सोबत ये , बघ हे जंगल किती सुंदर आहे ."
चित्त्याने विचार केला ,आणि उंदरा सोबत निघाला .

पुढे हत्ती ड्रग्स घेताना दिसला
उंदीर -"हत्ती माझ्या मित्र सोड हि नशा ...."
हत्ती सुद्धा सोबत निघाला
पुढे १ वाघ विस्की चा पेग बनवत होता ,
उंदीर त्याला तेच म्हणाला ...
वाघाने ग्लास बाजूला ठेवला , उंदराच्या ५ -७ कानाखाली वाजवल्या ..
हत्ती -"अरे उंदीर चांगला सांगतोय का मारलेस बिचार्याला ?"
वाघ -"हा जेव्हा जेव्हा देशी पितो ...तेवा असेच बोलतो , ३ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय मी याच्यासोबत !!!"

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #6 on: January 16, 2012, 07:50:43 PM »
जेव्हा कोणावर वाईट वेळ येते,
तेव्हा मित्र आणि परिवार त्याच्यामागे ठामपणे उभे राहतात.
जर खरच विश्वास बसत नसेल तर
.
.
.
.
.
.
.
कोणाच्या ही लग्नाचा फोटो पहा प्रूफ म्हणून…….

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #7 on: January 16, 2012, 07:51:17 PM »
बंड्या : पोलीस काका, तुम्हाला कसली भीती वाटते?

पोलीस : कसलीच नाही.

बंड्या : मग तुम्ही बंदूक घेऊन का उभे राहता?

Chota Kavi

Re: मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #8 on: January 16, 2012, 07:52:57 PM »
जीन : काय हुकुम आहे आका?

आका: माझ्या आकाउंट मध्ये ५० करोड कॅश आणि कॅतरीना सोबत लग्न करवून दे

जीन: आका……………!

हुकुम करा मस्करी नको.

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Jokes (Very Funny)
« Reply #9 on: January 16, 2012, 07:53:51 PM »
क्रिकेट स्टेडियम बाहेरील पुणेरी पाटी
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.

२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.

३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा … एका खुर्चीवर एकच !

४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.

५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये

Chota Kavi

Re: मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #10 on: January 17, 2012, 12:40:59 AM »
एकदा आमदारपदाची निवडणूक होते. मतदान मोजणी झाल्यानंतर एका आमदाराला धक्काच बसतो.

तो विचारात पडतो. त्याला समजतच नाही,

तो म्हणतो, "च्यामारी, कोण होता तो ज्याने एकट्याने मला मत दिलं."

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Jokes (Very Funny)
« Reply #11 on: January 17, 2012, 03:20:37 PM »
प्राध्यापक साठे घाईघाईने वर्गात आले आणि पुस्तक उघडून त्यांनी विचारले, ‘तर मी काल कुठ आलो होतो ?’
‘इथच या वर्गात सर !’ एका मुलाने उत्तर दिले.

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Jokes (Very Funny)
« Reply #12 on: January 17, 2012, 03:21:05 PM »
कॉलेजची ती पहिलीच भेट होती,
पहिल्याँदा भेटणारी ती अगदिच ग्रेट होती,
त्यानंतर तिलाच भेटण्याची सवय लागली होती,
दररोज जातायेता तीची भेट होतहोती,
चमकत्या ज्योतीसारखी ती दिसत होती,
चुकून आली उशिरा तर काळजी वाटत होती,
ती तर आमच्या गावची बस होती.. :)

Chota Kavi

"मुलगा- तुझी खुप आठवण येत होती. म्हटलं फोन करुया...
मुलगी- अरे सोन्या, आताच आपण तासभर बोललो ना.. ...
मुलगा- आयला... परत तुलाच फोन लागला...??"

Chota Kavi

Re: मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #14 on: January 17, 2012, 03:22:55 PM »
न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं...
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं...
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं...!!

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Joke (Very Funny) Lai Bhaari
« Reply #15 on: January 17, 2012, 03:23:24 PM »
शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.

Chota Kavi

मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)
« Reply #16 on: January 17, 2012, 03:24:38 PM »
मराठी विनोद Marathi Joke (Very Funny)

सोनीवरच्या सीआयडी सीरियलचा पुणेकरांवर प्रभाव-
घराच्या दारावरची पाटी...

तुम्ही सीआयडीमधून आला असाल, तर घराची चावी शेजारी आहे..
ओळखपत्र दाखवून शेजाऱ्यांकडून घ्यावी...
उगाच ताकद आहे म्हणून दरवाजा तोडू नये..