घरमे और भी है
« on: September 06, 2015, 09:20:12 PM »
एकदा एका सरदारजीला त्याचा मित्र लग्नाला आमंत्रित करतो.  सरदारजीला वाटत आपण लग्नात  चार चौघात उठून दिसू अस काही तरी घालायचं.

असा विचार करून तो शहरातल्या Ralymond च्या सर्वात मोठ्या शोरूम मध्ये जातो आणि काउनटर च्या पलीकडे उभा असलेल्या सेल्समनला सर्वात महाग सुटाच कापड दाखवायला विनंती करतो.

सेल्समन विनम्र पणे सरदारजीला विविध रंगाचे चे नमुने दाखवतो. त्यातला एक रंग सरदारजी ला आवडतो. मग तो  सेल्समन सरदारजीला विचारते ”या तागातून किती कापड कापू.”

यावर सरदारजी म्हणतो “मला हा संपूर्ण ताग विकत घ्यायचा आहे”.

तो सेल्समन सरदारजीला पूर्ण ताग pack  करून देतो.

सरदारजी घराजवळ नेहमी ज्या stop वर बस मधून उतरतो त्या stop च्या समोर त्याच्या टेलर च दुकान असत.

सरदारजी बस मधून उतरतो आणि कापड घेउन टेलर च्या दुकानात शिरतो. टेलर सरदारजीला पाहून विचारतो “क्या बात है सरदारजी आप पुरा ताग उठा के ले आया”.

त्यावर सरदारजी टेलरला  म्हणतो “ वो क्या है ना, सोमवार को मुझे मेरे दोस्त कि शादी में जानां है इसीलिये मुझे सूट सिलाना है”

टेलर म्हणतो “लेकीन इतना कपडा”

टेलरच वाक्य एकूण सरदारजी त्याला म्हणतो “सूट के साथ बनियान, टाय, लंगोट भी इसी कपडे से सिलाना है”.

टेलर हे ऐकून मनातल्या मनात हसतो आणि सरदारजीला म्हणतो “ठीक है सरदारजी रविवार को दुकान बंद करने के Time आपको आपका कपडा मिल जायेगा”.

ठरल्या प्रमाणे सरदारजी रविवारी रात्री आपल्या कपड्याची डिलिवरी घेण्या करता टेलर च्या दुकानात हजर होतो. सरदारजी दुकानात येतो तेव्हा टेलर सरदारजीच काम करत असतो. कसबस टेलर सरदारजीच काम पूर्ण करतो आणि घाई घाईत सर्व कपडे pack करतो. सर्व कपडे शिवून सुद्धा तागातला खूप कपडा शिल्लक राहतो. टेलर बाकी राहिलेला कपडा शिवलेल्या कपड्यांच्या पिशवीत घालून ती पिशवी सरदारजीच्या स्वाधीन करतो.

कपड्याची bag पाहून सरदारजी चा जीव भांड्यात पडतो. सरदारजी लगेच घरी येतो कारण त्याला सकाळी नवीन कपडे घालून सहा ची बस गाटायची असते.

सरदारजी वेळेवर लग्नाच्या हॉल वर पोचतो. सरदारजी ला लग्नातल्या मंडळीला दाखवायचं असत कि कोट,  pant आणि शर्टा प्रमाणे त्याची बनियान आणि लंगोट  सुद्धा Ralymond च्या महागड्या कपड्यांनी शिवली आहेत. म्हणून सरदारजी हॉल मध्ये प्रवेश करण्या पूर्वी शर्टाची दोन तीन buttons आणि pant ची  zip (fly) उघडी ठेवतो.

हॉल मध्ये सरदारजीच्या समोर येणारा प्रत्येक माणूस सरदारजीला पाहून तोंडावर हाथ ठेवून हसतो. सरदारजीला वाटत कि लोकांना त्याच्या ड्रेस च कापड आवडल म्हणून लोक त्याला हसत आहेत. पुढे  कोणी सरदारजीला पाहून हसला कि लगेच सरदारजी त्याला म्हणायचा “ घरमे और भी है”. सरदारजीच सांगायचं तात्पर्य असत कि “माझ्या घरी असला खूप कपडा अजून शिल्लक आहे”.

लग्न आटपून सरदारजी रात्री बस नी घरी येतो. बस मधून उतरत असताना सरदारजीचा टेलर त्याल दुरून पाहतो आणि हाक मारून बोलावतो.

दुकानात सरदारजी समोर येताच टेलर त्याला शिवलेली लंगोट देत म्हणतो “कल रात को घाई गर्दी में, मै ये लंगोट देने को भूल गया”.