गाणार ना सरदारजी
« on: November 15, 2015, 05:08:15 AM »
सुहासिनी मुळगावकर हे नाव  मराठी संगीत  आणि रंगभूमी ला लाभलेलं वरदान होत. मुंबई दूरदर्शनवर होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या असत.  मराठी रंगभूमीवर आधारित प्रतिभा आणि प्रतिमा हा त्यांचा दूरदर्शन वर सादर होणाऱ्या अनेक कार्यक्रमा पैकी सर्वात नावाजलेला कार्यक्रम होता.  प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात सुहासिनी बाई मराठी नाट्य क्षेत्रातल्या मान्यवर कलाकारांना आमंत्रित करून त्यांची मुलाखत घेत असत आणि जर तो कलाकार  गायक असला  तर  त्या कलाकाराला सुहासिनी बाई नाट्य संगीत सादर करण्याचा आग्रह करत. त्यांची आमंत्रित कलाकारालाआग्रह करायची पद्दत काही और होती.  जरा लाडात येउन आणि कलाकाराच नाव घेऊन त्या नेहमी आग्रह करीत असत. उदाहरण द्यायचं झालं तर "गाणार ना  गंधर्वजी" अस म्हणत त्यांनी कुमार गंधर्व ना गाण्याचा आग्रह केला होता.

एकदा त्यांच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार पाहुणे म्हणून आले होते. नेहमी प्रमाणे मुलाखतीनंतर सुहासिनी बाई नी आपल्या नेहमी च्या पद्दतीने, लाडात येउन गाण्याची फ़र्माईश करत प्रभुदेव सरदार ना म्हणाल्या "गाणार ना सरदारजी ".