m4marathi Forum

मराठी सण / मराठी फेस्टिवल (Marathi San/ Marathi Festival) => मराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival) => गणेश चतुर्थी ( Ganesh chaturthi ) => Topic started by: mitalibahl on October 19, 2016, 01:04:59 PM

Title: पाहुणा गावाला निघाला!
Post by: mitalibahl on October 19, 2016, 01:04:59 PM
काही महिने आधीच गजराजाची मूर्ती घडवण्याचे काम मूर्तीकार सुरु करतात. विविध आकारातील, रुपातील, रंगसंगतीचा मेळ साधणा-या अशा भक्तांच्या मागणीनुसार बाप्पाच्या प्रतिमा तयार होतात. गणेशाच्या आगमनाची ही चाहूल, तर घरोघरी सफाई करण्यापासून पाहुण्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यापर्यंतच्या तयारीत गणेशभक्तही तल्लीन होतो. घरी आलेल्या बाप्पाचे मनोभावे कौतुक करताना त्याच्या सहवासातील हा अकरावा दिवस कधी उजाडतो समजतही नाही. ‘तो’ घरी येणार ही जाणीव जितकी सुखदायक तितकीच, तो आता परतणार ही भावना नकोशी वाटते. प्रसन्न वातावरण निर्माण करणा-या लंबोदराचे विसर्जन करताना डोळ्यांत पाणी तरळते व मन ‘बाप्पा पुढल्या वर्षी लवकर ये!’ असे हक्काने म्हणते आणि बाप्पा देखील दरवर्षी उत्साहाचं गाठोडं घेऊन येतो.

अधिक वाचा - पाहुणा गावाला निघाला!
https://goo.gl/Bkq2g7 (https://goo.gl/Bkq2g7)

(http://www.zeemarathijagruti.com/assets/images/knowledgehub_img/pahuna-gavala-neegala.jpg)
Title: Re: पाहुणा गावाला निघाला!
Post by: simran254 on June 26, 2022, 12:59:06 PM
मराठी सण, मराठी फेस्टिवल ,Marathi San, Marathi Festival,