sonam

हरतालिका-व्रतपूजा साहित्य

साहित्य
फुले , दूर्वा , तुलसीपत्रे , विड्याची पाने १२ , सुपार्‍या ६ , बदाम ५ , खारका ५ , नारळ २ , फळे / केळी ५ , पेढे ५ / खडीसाखर
पत्री
( पत्रपूजेतील क्रमानुसार ) - बेल , आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ , अशोक .( उपलब्धीप्रमाणे )
सौभाग्यवायनसाहित्य
  परडीत / पत्रावळीवर - हळदकुंकू , तांदूळ , वस्त्र , पानसुपारी , नाणे , नारळ , गजरा / वेणी , शिधा तसेच ; फणी , काजळ , गळेसरी , कांकणे , आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये .
गृह्यसाहित्य
अत्तरफाया , हळदकुंकू , चंदनगंध , अष्टगंध , गुलाल , बुक्का , अक्षता , रांगोळी , उदबत्ती , कापूर , आगपेटी , सुटीनाणी ६ , तुपाच्या व तेलाच्या वाती , कापसाची मालावस्त्रे - १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १ , तांदूळ ( वाटीभर ) पंचामृत ( दूध , दही , तूप , मध , साखर ) गूळखोबरे , नैवेद्य , सुंठवडा ( डिंकवडा ), चौरंग / पाट , आसन , पाण्याचा कलश , शंख , घंटा , समई , नीराजने , कापूरारती , पळीपंचपात्र , ताम्हण , देव पुसण्याचे वस्त्र , हातपुसणे , तसराळे , पेलाभर उष्णोदक .
व्रतोद्देश
कुमारीना सुयोग्य वरप्राप्ती , सुवासिनींना अखंडसौभाग्यप्राप्ती .
पूजार्ह देवता
पार्वती व हरिताली : ( मृत्तिकेच्या मूर्ती व वाळूचे शिवलिंग )
पूजाकाल   :भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम प्रहरात ही पूजा करावी
व्रताचार  : ही पूजा अविवाहित व विवाहित अशा सर्वच स्त्रिया करतात . ह्या दिवशी उपवास करावा . रात्रौ यथाशक्ति जागरण करून देवीची आरती करावी .

simran254

मराठी सण, मराठी फेस्टिवल ,Marathi San, Marathi Festival,