--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)
--------------------------------------------------------------------------------------------
होळी (holi)
देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट्रात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला `वसंतोत्सव' अथवा `वसंतागमनोत्सव' म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून कितीही धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच लोप पावलेले नाही. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात.
समानार्थी शब्द : 'होळीला महाराष्ट्रात 'शिमगा' म्हणतात, दक्षिणेत 'कामदहन' म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो. `हुताशनी', असेही होळीला नाव आहे.
ह़ोळी पेटविण्याची योग्य पद्धत
देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।' हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी' उत्सव साजरा करतात.
फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसर्या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात या उत्सवाला आपण होळी म्हणतो. पण वेगवेगळया प्रांतात याची नावे वेगवेगळी आहेत. उत्तर भारतात याला दोलायात्रा म्हणतात. महाराष्ट्र्रात शिमगा असेही म्हणतात. दक्षिण भारतात हा सण कामदहन या नावाने ओळखला जातो.
या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठवुन टाकणार्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणार्या अग्नीला कृतज्ञतापुर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत.
भारतातल्या वेगवेगळया भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी" "शिमगा", "हुताशनी महोत्सव" "दोलायात्र", "कामदह" अशा वेगवेगळया संज्ञाम्प्;ाा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणार्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव" आणि दुसर्या दिवशी सुरू होणार्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.
पौराणिक दाखले :
लहान मुलांना पीडा देणार्या "होलिका", "ढुंढ", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता.) "मदनदहन";"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.
विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पातळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक, सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.
आजच्या लोकोत्सव "होलिकोत्सव(होळी)", "धूलिकोत्सव" (धूळवड) आणि "रंगोत्सव" (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावानं "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)
--------------------------------------------------------------------------------------------