sonam

कोजागिरी पोर्निमेसाठी मसाला दुध : मसाला दुध - Masala Dudh Recipe for kojagiri purnima


साहित्य:
४  कप दुध
६  टेस्पून साखर

मसाल्यासाठी साहित्य:

१/२  कप बदामाची पूड
२  टेस्पून पिस्ता पूड
१  टिस्पून वेलचीपूड
१  चिमूटभर जायफळ पूड
२  चिमूटभर केशर

कृती:
१) बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) ४  कप दूध गरम करावे. त्यात ६ टेस्पून किंवा गरजेनुसार साखर घालावी. बनवलेला मसाला ३  टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे .

हि कृती ४ कप दुधासाठी आहे , आपल्या गरजेनुसार प्रमाण ठरवून आपण या कोजागिरीला मसाला दुध बनवून , आनंदाने कोजागिरी साजरी करू शकतात .

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

कोजागिरी पोर्निमेसाठी मसाला दुध : मसाला दुध - Masala Dudh Recipe for kojagiri purnima