Manasi

मकरसंक्रांत / मकर संक्रांत / मकरसंक्रांती / मकर संक्रांती ( Makar Sankrant / MakarSankrant / MakarSankrant / Makar Sankranti)

-------------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
-------------------------------------------------------------------------------------------------
मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.(अयन=चलन/ढळणे) हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणाऱ्या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होतो. हा दिवस मोठा होतो व रात्र लहान होत असते. म्हणून सर्वांना मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो.

संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.


मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली.

या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तीळ व तांदूळ अर्पण करतात व संक्रांत निमित्य सौभाग्य वाण लुटतात. हा सण परस्परांमध्ये स्नेह व प्रेम असावे असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवशी तीळगुळ देतांना ``तीळगुळ घ्या, गोड गोड बोला'' असे म्हणण्याची पध्दत आहे.

या दिवशी लहान थोर सर्व मंडळी विविध रंगाच्या पतंगी उडविण्याचा आनंद लुटतात. संध्याकाळच्या वेळी आकाश विविध रंगांच्या पतंगीने सुशोभित झालेले असते. हा सण परस्परांमध्ये प्रेम व सद्भाव वृध्दिंगत करीत असतो.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.


महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात. तो सण म्हणजे मकरसंक्रांत ! सूर्याच्या मकरसंक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण वर्षभरात बारा राशीतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते.

हिंदुस्थानात बहुतेक भागात हा सण साजरा केला जातो. दक्षिणेत याचवेळी पोंगळ ( पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करीदिन म्हणतात. स्त्रिया मृत्तिका घटाचे दान देतात व देवाला तीळ, तांदूळ अर्पण करतात आणि संक्रातीनिमित्त सौभाग्यपण लुटतात. या दिवशी तीळगुळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी वहिवाट आहे. मकरसंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो.

प्रत्येकाचे आयुष्य सध्या धावपळीचे आहे. त्यामुळे स्वतःकडेही लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. यात आपण बदल करणे आवश्यक झाले आहे. मकरसंक्रांत हा सरण रथसप्तमीपर्यंत चालत असून, यात रोज एखाद्या स्त्रीकडे हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. समजा आपण हा कार्यक्रम एका मोठ्या सभागृहात आयोजित करून यात विवाहित, अविवाहित, तसेच विधवा स्त्रियांना सहभागी करून या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्र्माचे आयोजन करून स्त्रियांमध्ये दडलेली कलाकृती सादर करण्यास एक उत्तम अशी संधी देऊन आपल्यामध्येसुद्धा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आपल्यालासुद्धा या जगातं, समाजात एक विशिष्ट प्रतिष्ठा आहे याची जाणीव प्रत्येक स्त्रीला होईल.

यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले तर नोकरी करणाऱ्या तसेच गृहिणींना आपली आवड सहजरीत्या जोपासता येईल व समाजाला एक नवी दिशा मिळेल. हळदीकुंकवाच्या वेळी एखादी वस्तू वाण म्हणून दिले जाते यात देवांची पोथी, रोपटे, पुस्तके यासारख्या ज्या की नेहमी उपयोगात, आठवणीत राहतील यासारखे साहित्य द्यावे तर मग आली जवळ मकरसंक्रांत लागायचंना तीळगुळाचे लाडू करायला म्हणून शेवटी जाताजाता ‘तीळगुळ घ्या गोड बोला’

-------------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
-------------------------------------------------------------------------------------------------

simran254

मराठी सण, मराठी फेस्टिवल ,Marathi San, Marathi Festival,