गझल
सखे मलाही पहाट वेळी ,हवे तसे तू जगायला दे
अनेकदा मारले स्वतः ला ,अता तरी तू हसायला दे
दुरावला चंद्र दूर गेले , अजून तारे निवास करण्या
अजून ओसाड नभाला ,हरेकदा तू बघायला दे
स्मशान सारे निवांत आहे, उगा तुला दुःख हे कशाचे
हिशेब राखेत शोध माझे, मला निरंतर निजायला दे
कुठे मिळे पुर्नजन्म जगण्या, भ्रमात असतात सज्जनेही
नको मला स्वर्ग भावनांचा ,सुखात आता रहायला दे
सखे निवार्यात लाघवी या ,अजूनही सांज ही गुलाबी
नभात फिरतात पाखरे ही , नको म्हणू तू उडायला दे