जगदीश खेबूडकर ( Jagdish Khebudkar)
---------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी गीतकार ( Marathi Gitkar / Marathi Geetkar )
---------------------------------------------------------------------------------------------------------
जगदीश खेबूडकर हे मराठी गीतकार होते.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. खेबूडकर वयाच्या ७९व्या वर्षी ३ मे २०११ रोजी निधन पावले. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
देवघरात म्हणायची भक्तीरसपूर्ण गाणी असोत, किंवा ठसकेबाज लावणी... आपल्या नवनवोन्मेषी प्रतिभेच्या जोरावर ही दोन्ही परस्परविरोधी गीतं एकाचवेळी समर्थपणे लिहिणारे, मराठी चित्रपटांना अनेक अजरामर गीतांची देणगी देणारे ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचं आज निधन झालं. कोल्हापुरातल्या आधार हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८० वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्यानं जगदीश खेबुडकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीचे काही दिवस ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. परंतु, नंतर त्यांची तब्येत अचानक खालावली गेली आणि किडनी निकामी झाल्यानं आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेजगतात शोककळा पसरली आहे.
जगदीश खेबुडकर यांचा जन्म १० मे १९३२ सालचा. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि इथेच त्यांचं कार्यक्षेत्र ठरून गेलं. १९५६ रोजी त्यांचेपहिले गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं, तर १९६० रोजी त्यांचं पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आलं. त्यानंतर या प्रतिभासंपन्न कवीनं मागे वळून पाहिलं नाही. उत्कट भावभावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार त्यांच्या लेखणीतून साकारत गेला आणि त्यांनी मराठी गीत-संगीतप्रेमींना मोहून टाकलं. आकाशी झेप घे रे पाखरा, पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, विठुमाऊली तू माऊली जगाची, ऐरणीच्या देवा तुला, कसं काय पाटील बरं हाय का, अष्टविनायका तुझा महिमा कसा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल यासारखी बहुरंगी, बहुढंगी गाणी त्यांनी लिहिली आणि मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. पिंजरा चित्रपटातल्या प्रत्येक लावणीतला प्रत्येक शब्द त्यांनी ज्या ताकदीनं लिहिला त्याला तोड नव्हती.
आपल्या ५०-५२ वर्षांच्या कारकीर्दीत साडेतीन हजार कविता , पावणेतीन हजारचित्रगीते , २५ पटकथा , संवाद , ५० लघुकथा , पाच नाटके , चार दूरदर्शन मालिका, चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते जगदीश खेबुडकरांच्या नावावर जमा आहेत. जुन्या काळातील अनेक मातब्बर गायक-संगीतकारांसोबत त्यांनी जितक्या सहजतेनं काम केलं, तितक्याच सोपेपणानं त्यांनी नव्या पिढीतल्या गायक-संगीतकारांशीही जुळवून घेतलं. अलिकडच्या काळात अजय-अतुलनं संगीतबद्ध केलेलं मोरया-मोरया हे गाणंही खेबुडकरांचंच आहे. किंबहुना, अजय-अतुलच्या संगीतावर खेबुडकरांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. यातून त्यांचं सामर्थ्य सहज लक्षात येतं.
सिनेसंगीतविश्वाला दिलेल्या योगदानाबद्दल जगदीश खेबुडकर यांना व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, ‘ मृत्युंजय ’ कार शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व स्मारक समिताचा बालगंधर्व पुरस्कार यासारखे अनेक सन्मान मिळाले होते.
मी साहित्यिक झालो, जन्माचं सार्थक झालं, अशा भावना ठाण्याच्या साहित्य संमेलनात व्यक्त करणा-या जगदीश खेबुडकरांनी आज ईहलोकीचा निरोप घेतला. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची गाणी आपल्या ओठांवर कायमच येतील, आकाशवाणीवर त्यांचं गाणं वाजलं नाही, असा एकही दिवस जाणार नाही, अशा भावना व्यक्त करत सिने-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जगदीश खेबूडकर यांना "जीवनगौरव' पुरस्कार
पुणे - प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळातर्फे ज्येष्ठ कवी-गीतकार जगदीश खेबूडकर यांना यंदाचा "जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. 21 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गोव्याचे कवी पुष्पाग्रज यांच्या "शां. ति. अ. वे. द. ना.', पिंपळगाव बसवंत येथील ऐश्वर्या पाटेकर यांच्या "भुईशास्त्र' आणि उरुळीकांचन येथील कल्पना दुधाळ यांच्या "सीझर कर म्हणतेय माती' या कवितासंग्रहांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी पाच हजार एक रुपये आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त शनिवारी (ता. 12) टिळक स्मारक मंदिर येथे रात्री साडेआठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार उल्हास पवार आणि अनिल भोसले उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि विजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानिमित्ताने होणाऱ्या कवी संमेलनामध्ये रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं.
खेबुडकरांची गाणी : Jagadish Khebudkaranchi gaani
गीतकार - जगदीश खेबूडकर
अगं नाच नाच राधे उडवूया Aga Nach Nach Radhe
अन् हल्लगीच्या तालावर ढोल An Hallagichya Talavar
अशी कशी ओढ बाई Ashi Kashi Odha Bai
अष्टविनायका तुझा महिमा Ashta Vinayaka Tujha
असावा असा सुखी संसार Asava Asa Sukhi Sansar
अहो अहो कारभारी हो Aho Aho Karabhari Ho
आई उदे ग अंबाबाई Aai Ude Ga Amba Bai
आकाशी झेप घे रे Aakashi Zep Ghe Re
आज कळीला एक फूल भेटले Aaj Kalila Ek Phool Bhetale
आज प्रीतिला पंख हे लाभले Aaj Preetila Pankh He
आधार तू जीवनी आधार Aadhar Tu Jeevani Aadhar
आम्ही चालवू हा पुढे वारसा Aamhi Chalavu Ha Pudhe
आली आली हो भागाबाई Aali Aali Ho Bhagabai
आली ठुमकत नार लचकत Aali Thumakat Nar Lachakat
आल्या नाचत नाचत मेनका Aalya Nachat Nachat
इथे मिळाली सागर-सरिता Ithe Milali Sagar-Sarita
उई साजण आला Ui Sajan Aala
उठा उठा सूर्यनारायणा Utha Utha SuryaNarayana
उद्योगाचे घरी देवता Udyogache Ghari Devata
ऊठ पांडुरंगा आता Utha Panduranga Aata
एक लाजरा न् साजरा मुखडा Ek Lajara N Sajara
एकतारिसंगे एकरूप झालो Ekatari Sange Ekaroop
ऐरणिच्या देवा तुला ठिणगि Airanichya Deva Tula
ओवाळिते मी लाडक्या भाऊराया Ovalite Mi Ladkya BhauRaya
कधी तू हसावे कधी तू रुसावे Kadhi Tu Hasave Kadhi Tu
करी दिवसाची रात माझी Kari Divasachi Raat Majhi
कल्पनेचा कुंचला Kalpanecha Kunchala
कशी नशीबाने थट्टा आज Kashi Nashibane Thatta Aaj
कसं काय पाटील बरं Kasa Kaay Patil Bara
किती सांगू मी सांगू कुणाला Kiti Sangu Mi Sangu Kunala
कुणी ग बाई मारली कोपरखळी Kuni Ga Bai Marali
कुण्या गावाचं आलं पाखरू Kunya Gavacha Aala
कोण होतीस तू काय झालीस Kon Hotis Tu Kaay Jhalis
ग बाई बाई झोंबतो गारवा Ga Bai Jhombato Garava
गणगौळण झाली सुरू Gan Gaulan Jhali Suru
गणपती तू गुणपती तू Ganapati Tu Gunapati Tu
गळ्यात माझ्या बांधा एक Galyat Majhya Bandha Ek
गुलजार गुलछडी नटून मी Guljar Gulachadi Natun Mi
गोऱ्या गोऱ्या टाचंत काटा Gorya Gorya Tachet Kata
घेऊ कसा उखाणा Gheu Kasa Ukhana
घेऊन मैफलीचा रात्रीतला Gheun Maiphalicha Ratritala
चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा Chandanachya Devharyat
चांदण्यात ह्या धरणी हसते Chandanyat Hya Dharani
चंद्र आहे साक्षिला Chandra Aahe Sakshila
चंद्र होता साक्षीला Chandra Hota Sakshila
चंद्रातुनी तुझ्या या बरसात Chandratuni Tujhya Ya
छबीदार छबी मी तोऱ्यात Chabidar Chabi Mi Toryat
जय जय हो महाराष्ट्रचा Jay Jay Ho Maharashtracha
जागे व्हा मुनिराज Jage Vha Muniraj
जीवन गगन मी पाखरू Jivan Gagan Mi Pakharu
झन झननन छेडित तारा Jhan Jhannan Chedit Tara
टाळ बोले चिपळीला Taal Bole Chipalila
ठुमकत आल्या किती गौळणी Thumakat Aalya Kiti Gaulani
तुझे रूप राणी कुणासारखे Tujhe Roop Rani
तुम्हांवर केलि मि मर्जि Tumhavar Keli Mi Marji
तू उदास का Tu Udas Ka
तू ... मी ... रे साजणा Tu...Mi...Re Sajana
तांडा चालला रे गड्या Tanda Chalala Re Gadya
दाम करी काम येड्या Daam Kari Kaam
दिसला ग बाई दिसला Disala Ga Bai Disala
दूर राहुनी पाहु नको रे Dur Rahuni Pahu Nako Re
दे रे कान्हा चोळी अन् De Re Kanha Choli
देवमानुस देवळात आला Devmanus Devalat Aala
देवापुडं मानूस पालापाचोळा Devapudha Manus Pala
देश हा देव असे माझा Desh Ha Dev Ase Majha
देहाची तिजोरी भक्तीचाच Dehachi Tijori
धनगराची मेंढरं गा Dhanagarachi Mendhara Ga
धागा जुळला जीव फुलला Dhaga Julala Jeeva Phulala
धुंद आज डोळे हवा धुंद Dhund Aaj Dole
धुंद एकांत हा Dhund Ekant Ha
धुंद ही हवा तरी फूल फुलेना Dhund Hi Hava Tari Phool
धुंदी कळ्यांना धुंदी Dhundi Kalyana Dhundi
धुंदीत गाऊ मस्तीत राहू Dhundit Gau Mastit Rahu
नका तोडू पावणं जरा थांबा Naka Todu Pavana Jara
नाच ग घुमा कशी मी Nach Ga Ghuma Kashi Mi
नाचतो डोंबारी रं Nachato Domabari Ra
निसर्गराजा ऐक सांगते Nisarga Raja Aik Sangate
निळे गगन निळी धरा Nile Gagan Nili Dhara
पाहुनी प्यारभरी मुसकान Pahuni Pyarbhari Muskan
पिकल्या पानाचा देठ Pikalya Panacha Deth Ki Ho
प्रभू सोमनाथा Prabhu Somanatha
प्रेमाला उपमा नाही हे Premala Upama Nahi
फुलं स्वप्नाला आली ग Phula Swapnala Aali Ga
फूलपाखरू झालो रे मी Phoolpakharu Jhalo Re Mi
बाई बाई मन मोराचा Bai Bai Man Moracha
बाजार फुलांचा भरला Bajar Phulancha Bharala
बिब्बं घ्या बिब्बं Bibba Ghya Bibba Shikkakai
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर Bramha Vishnu Aani
मथुरेला कृष्ण निघाला Mathurela Krishna Nighala
मनोगतांचे उंच मनोरे Manogatanche Unch
मला इष्काचि इंगळी डसली Mala Ishkachi Ingali Dasali
मला लागली कुणाची उचकी Mala Lagali Kunachi Uchaki
मला हो म्हणतात लवंगि मिरची Mala Ho Mhanatat Lavangi
माझ्या भावाला माझी माया Majhya Bhavala Majhi Maya
मी आज फूल झाले Mi Aaj Phul Jhale
मी जलवंती मी फुलवंती Mi Jalavanti Mi Phulavanti
मी सुखाने नाहले Mi Sukhane Nahale
मैत्रिणींनो थांबा थोडं Maitrino Thamba Thoda
या नव्या सुखाला काय म्हणू Ya Navya Sukhala Kaay
या मीलनी रात्र ही रंगली Ya Milani Ratra Hi Rangali
या रावजी बसा भावजी Ya Ravaji Basa Bhavaji
रवि आला हो रवि आला Ravi Aala Ho Ravi Aala
राजसा घ्यावा गोविंद विडा Rajasa Ghyava Govind Vida
राजा ललकारी अशी घे Raja Lalakari Ashi Ghe
राया मला जरतारी शालू आणा Raya Mala Jartari Shalu
रुणझुणत्या पाखरा जा रे Runajhunatya Pakhara Ja
लाजले मी लाजले Lajale Mi Lajale
लेक माझी लाडकी तू Lek Majhi Ladaki Tu
वारा गाई गाणे Vara Gai Gane
विठुमाऊली तू माऊली जगाची Vithu Mauli Tu Mauli Jagachi
वेडी खुळी ही प्रीत मला Vedi Khuli Hi Preet Mala
शंकरा करुणाकरा Shankara Karunakara
शुभंकरोति म्हणा मुलांनो Shubhankaroti Mhana
सख्या रे घायाळ मी Sakhya Re Ghayal Mi Harini
सख्या हो आज मला सावरा Sakhya Ho Aaj Mala Savara
सजणी ग भुललो मी Sajani Ga Bholalo Mi
सत्य शिवाहुन सुंदर हे Satya Shivahun Sundar He
सत्यम् शिवम् सुंदरा Satyam Shivam Sundara
सावधान होई वेड्या Savadhan Hoi Vedya
सोळावं वरीस धोक्याचं Solava Varis Dhokyacha
संसार-मंदिरी या Sansar Mandiri Ya Nahi Une
संसार मांडते मी Sansar Mandate Mi
संसार हा सुखाचा Sansar Ha Sukhacha
सांग सखे मी चोर कसा Sang Sakhe Mi Chor Kasa
सांभाळ दौलत सांभाळ Sambhal Dauat Sambhal
सुंबरान गावू चला सुंबरान Sumbaran Gavu Chala
स्वप्नांत रंगले मी Swapnat Rangale Mi
स्वप्नात साजणा येशील का Svapnat Sajana Yeshil Ka
हलके हलके जोजवा Halake Halake Jojava
हवास मज तू हवास तू Havas Tu Havas Tu
हसले फसले हरवून मला मी Hasale Phasale Harvun
हा सागरी किनारा Ha Sagari Kinara
हिरवा निसर्ग हा भवतीने Hirava Nisarga Ha Bhavatine
हिशोब सांगते ऐका भावजी Hishob Sangate Aika Bhavaji
ही कशानं धुंदी आली Hi Kashana Dhundi Aali
ही तुमची भारतमाता Hi Tumachi Bharat Mata
ही दुनिया हाय एक जतरा Hi Duniya Haay Ek Jatara
श्रीरामाच्या पूजेसाठी आज Shri Ramachya Pujesathi
---------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी गीतकार ( Marathi Gitkar / Marathi Geetkar )
---------------------------------------------------------------------------------------------------------