–महावीर सांगलीकर
अलीकडे शिवानी ब-याचदा आपला फोन उचलत नाही. व्हाट्सअॅपवर, फेसबुकवर पाठवलेल्या मेसेजला उत्तर देत नाही. तिचं काय चाललंय हे कळवत नाही. कधी फोनवर बोललीच तर त्या बोलण्यात आपुलकी नसते. आपण तिची सारखी काळजी करत असतो.... ही पोरगी अशी का वागतेय? न्यूमरॉलॉजीस्ट विचार करत होता. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर ‘गेली उडत’ या दोनच शब्दात त्यानं तिचा विचार डोक्यातनं कायमचा काढून टाकला असता. पण इथं त्याला ते शक्य नव्हतं.
त्याला असं कळलं की तिनं तिच्या टॅक्स कन्सल्टन्सीच्या बिझनेस बरोबरच एका नेटवर्क मार्केटींगमध्ये भाग घेतला आहे आणि त्या व्यवसायात तिचा बराच वेळ जात असतो. हे ऐकून त्याला तिची कीव करावीशी वाटली. मोठा रागही आला. तिला लगेच फोन करून झापावं असं त्याच्या मनात आलं, पण त्यानं तसं करण्याचं टाळलं.
परवा त्याला त्याच्या एका परिचिताचा फोन आला... ‘अहो तुम्ही मला तुमच्या भाचीचं कार्ड दिलं... माझं एक काम होतं, पण ती फोनच उचलत नाही’
न्यूमरॉलॉजीस्टनं लगेच तिला फोन लावला. तिनं तो उचलला नाही. त्यानं तिच्या दुस-या नंबरला फोन लावला. एखाद्या अनोळखी माणसाशी बोलावं तसं कोरडेपणानं ती म्हणाली, ‘बोला काय काम आहे?’ तिचे हे शब्द ऐकून तो गारच झाला.
ही जरा अतिच करते. हिचा प्रॉब्लेम तरी काय आहे?
अलीकडे आपण मध्येच अस्वस्थ होत असतो... ती कुणाशीतरी भांडते, आणि त्याच्या वेव्हज आपल्यापर्यंत पोहचत असतात. मनावर आणि हृदयावर ताण येतो. आपल्याला त्याचा भयानक त्रास होत असतो.
ती भांडते, कारण तिची मनस्थिती सध्या बरोबर नाही. तिचा बाप म्हणजे एक बेजबाबदार माणूस आहे. त्याला तिच्या भविष्यासी कांहीच देणंघेणं नाही. तिच्या आईनं तिच्याबद्दलच्या सगळ्या आशा सोडून दिल्या आहेत. आता तिला फक्त आपणच आहोत. फक्त आपणच तिला या अवस्थेतून बाहेर काढू शकतो. ती कशीही विचित्र वागत असली तरी आपण आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. ड्युटी फर्स्ट, इगो नंतर....
पण तिला आता धडा शिकवायलाच पाहिजे... तिच्याच भल्यासाठी. जरा आहीस्ते कदम. तिला फारसं न दुखवता.... तिला दुखवणं आपल्या अंगलट येऊ शकतं, आणि तिच्या दृष्टीनंही ते चांगलं ठरणार नाही.
रात्री त्यानं तिला मेसेज पाठवला, ‘हाय शिवानी, हाऊ आर यू?’
ती ऑनलाईन होती, पण तिनं उत्तर दिलं नाही.
‘शिवानी, हे काय चाललंय तुझं? तू माझ्या मेसेजला उत्तर का देत नाहीस? फोनवर माझ्याशी नीट का बोलत नाहीस?’
उत्तर नाही.
‘आज कुणा-कुणाशी भांडलीस?’
हे सगळे मेसेजेस ती वाचत होती, पण नो रिप्लाय.
‘शिवानी, तुला कांही प्रॉब्लेम असेल तर सांग मला... मी तो सोडवू शकतो...’
ब-याच वेळाने तिचं उत्तर आलं, ‘आज माझं माझ्या रूममेटशी भांडण झालं’
‘का भांडलीस तिच्याशी?’
‘मी नाही भांडले, तीच भांडली’
‘तू खोटं बोलतेस... तूच तिच्याशी भांडलीस.. माफी माग तिची.. तुझ्या मनावरचा भार हलका होईल’
‘मी नाही मागणार’
‘ठीक आहे... त्या मुलीची जन्मतारीख किती आहे?’
‘13’
‘मग ती तर तुझी चांगली मैत्रीण होऊ शकते’
‘.....’
‘तू लोकांचे फोन का उचलत नाहीस?’
‘कोणी सांगितले तुम्हाला?’
‘कोणी सांगायाला कशाला लागतं मला? शिवाय खुद्द मला तुझा अनुभव आहेच. शिवानी, जरा ऐक माझं.. अशी वागू नकोस’
‘.........’
नाहीतर तू एक काम कर.. तुझं कल्याण होईल त्यात’
‘?

‘
‘एकावेळी दोन घोड्यांवर स्वार होऊ नकोस. तू टॅक्स कन्सल्टन्सी पूर्ण बंद कर. त्यापेक्षा नेटवर्क मार्केटिंगकडं पूर्ण लक्ष दे. तसं केलंस तर तुला फ्लॅट, ऑफिस घ्यायची गरज पडणार नाही. म्हणजे तुझे पैसे पण खर्च होणार नाहीत.. तू रहा होस्टेलमध्येच कायमची. खर्च वाचेल तुझा. टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये काय ठेवलंय? स्टेट्स बिटस जाने दो भाड में. आणि फॅमिली लाईफ? त्याची तरी तुला काय गरज आहे? एकटं रहायची सवय आहे तुला. तुला बाप नको, आई नको आणि आता मामा पण नको.... मग नवरा आणि फॅमिली लाईफ तरी कशाला पाहिजे?’
‘मामा! बस्स करा टोमणे मारणं. थांबवा माझी काळजी करण्याचं.. आधीच मी वैतागलेय... पैशासाठी वनवन भटकत असते दिवसभर. त्यात तुम्ही उगीचच माझी काळजी करून टेन्शन घेत असता आणि मलापण टेन्शन देत असता’
‘कशाला वनवन भटकत असतेस? तुला हातचं सोडून पळत्याच्या मागं धावायची घाणेरडी सवय लागलीय.. पैसा पैसा पैसा... 10 हजार रुपयांवर खूष होतीस तू, आणि आता महिन्याच्या आत लाखाच्या वर मिळाले तरी पैशांची हाव काय सुटत नाही तुझी. माझंच चुकलं, मी तुला मोटीव्हेशनचा डोस जरा जास्तच दिला. त्याच्या साईड इफेक्ट्सचा विचार केला नाही. ....
पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2014/12/blog-post_27.html