तुझ्या त्या चेहऱ्यावरचं हसू तसंच रहावं, सदा…. असंच मला वाटते नेहमी. म्हणून मनातलं कधी ओठांवर आणलं नाही. कदाचित ते ऐकून तुझ्या चेहऱ्यावरचं smile नाहीसं झालं असतं किंवा अजूनच खुललं असतं…. आणि ते नाहीसं होणे, हे स्वयम परमेश्वरालाही रुचलं नसतं.… हा, अजून खुललं असतं तर ते किती छान … त्या उजव्या गालावर… नाही… नाही, डाव्या गालावर पडणारी खळी तर काही औरच…. त्यातून स्तुती केली तर काय खुलते खळी ती,… क्या बात !!!! … स्वर्गीय क्षण अगदी… मुळात ती खळी नाहीच, डोह आहे तो… मोहाचा डोह… कायम त्या डोहात बुडून जावे असा.
गालावरची खळी तर फक्त निमित्त मात्र, तुझ्या चेहराच किती बोलका आणि सुंदर…. इतका सुंदर चेहरा बनवणं त्या देवाला पुन्हा काही जमलं नसावं बहुतेक… चंद्र, चांदण्याची उपमा मला देयाची नाही त्या चेहऱ्याला.… उगाचच कशाला ना. त्या चेहऱ्याची किंमत मला कमी करायची नाही. त्याला दुसरं कोणतचं नावं शोभलं नसतं. म्हणून मी "सुंदर" च नावं ठेवलं तुझं.…"सुंदर" फक्त बोललं तरी किती छान वाटते मनाला, "सुंदर… सुंदर… सुंदर"…… किती वेळा नाव घेतलं तरी मन भरत नाही… पाणीदार डोळे, केसही काळेभोर… मागे बांधलेल्या केसांपेक्षा… मोकळे केस, छानच वाटतात तुला. येत-जाणाऱ्या वाऱ्यासोबत ते डोलत असतात. कधी तुझ्या चेहऱ्यावर मुद्दाम येतात. मग हळूच तू ते केस मानेवर एका बाजूला करतेस… तो सोहळा तर देखणा अगदी… त्या क्षणाला मनात खूप काही होते… अर्थात चांगलचं… तुझ्याविषयी वाईट असं येत नाही मनात.
हा, फक्त एकदाचं आलं होतं… वाईट म्हणू शकत नाही. पण आलेलं… तू जेव्हा जीभ काढून वेडावून दाखवलंसं ना तेव्हा… हो तेव्हाच… वाटलं,असंच तुला कूठेतरी पळवून घेऊन जाऊ. या जगापासून लांब… खूप लांब, अश्या ठिकाणी, जिथे कोणत्याच भावना नसाव्यात.… सुख-दुःख, ते तर खूप लांब असावं. फक्त तिथे असाव्यात आपल्या आठवणी… धुरकट असल्या तरीही चालतील, मग तिथेच एखादं छान असं टुमदार घर बांधावं… एखादी तुटकी-मुटकी झोपडीही चालेल. तुला आनंदात ठेवलं पाहिजे,बस्स… एवढंच मनात. दुःखाची सावली सुद्धा नसावी त्या संसारावर… आनंदाचं झाड असावं, आनंदाचे ढग, आनंदाची जमीन… सगळीकडेच आनंद… आभासी जग सगळं… तरीही तुझ्यासाठी निर्माण करीन मी.
एकदा पावसात भिजून आली होतीस… तेव्हा तर कळलं होतं, प्रेम काय असते ते, तेव्हापासून पाऊस मुद्धाम आवडायला लागला… तुझ्यामुळे पाऊस आवडायला लागला. प्रत्येक पावसात तुलाच बघतो.… अजूनही आणि पुढेही तसाच बघत राहीन… तुला रोज बघायची सवय तुच लावली आहेस ना. रोज एकतरी फोटो पाठवतेस मला… प्रत्येक फोटोत निराळीच वाटतेस.… वाटते, सगळ्या फोटोजचे फ्रेम करून घरात लावून टाकू, घराची शोभा वाढेल… पण लोकांच्या नजरा कश्या टाळायच्या ना… उगाचच नजर लागली असती तुला… म्हणून मनातचं सगळे फोटो फ्रेम करून लावून दिले … अगदी खिळे ठोकून.
तसा मी एकटाच…. status : Single म्हणजे… रोज घरी येता-जाता एखादं-दुसरं "couple" तरी दिसतेच. कधी बाहेर फिरायला गेलो तरी तिथेही " प्रेमी युगुल" असतात. मॉलमध्ये गेलो तरी तिथे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना पाहतो. तेव्हा मनात वाटून जाते, आपली सुद्धा अशी कोणी "G.F." असावी. G.F. चा full-form सांगायची गरज नाही ना… तसंच वाटते नेहमी, आपल्या सोबत कोणीतरी अशीच असावी, बाईकच्या मागच्या सीटवर बसून मला घट्ट धरणारी, ट्रेनमध्ये विंडो सीटजवळ बसून हळूच, नकळत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जाणारी, समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय मोकळे सोडून बसणारी आणि माझ्या call ची वाट बघणारी.
(पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2016/02/love-letter.htmlआवडलं तर नक्की share करा. )