---------------------शांती--------------------
मे महिन्यातील रणरणत्या उन्हात ती चालत होती, कडेवर इवलंसं मूल घेऊन..ऊन्हाने अन् भुकेने काऊन रडणारं..
आज शनिवार..शनीच्या मंदिरात अभिषेक करावा म्हणून घरातून लवकरच बाहेर पडली होती ती, पण
मालकाच्या घरी जाऊन उचल घ्यायला उशीर झाला..मालक तसे चांगले पण देवा धर्माचा त्यांना तिटकारा..कितीतरी वेळ ते सांगत होते की असे अभिषेक, पूजा करून काही होणार नाही.त्यापेक्षा हेच पैसे जमव.पोराला शिकव.मोठा कर.
पण...तिच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता..देवळातल्या पुजार्याचा..
"माई, तुझा घरधनी खूप पुण्यवान माणूस.देवधर्म पाळणारा.पण तुमच्या घराला शनीची साडेसाती लागली.त्यामुळे देवदर्शनाला जाताना तो अपघातात गेला.आता तुझा एकुलता एक लेक वाचवायचा असेल तर लवकरात लवकर शनीची शांती करून टाक.अभिषेक, पूजा केली की तुमच्या मागची साडेसाती निघून जाईल".
धनी गेला आता लेकरू गमावलं तर जगून काय करणार..म्हणून तिने ह्याच शनिवारी शांती करायची ठरवलं अन् त्यासाठीच ती लगबगीने निघाली होती..मालकाने होय नाही करत मालकिणीच्या म्हणण्यावरून 500 रूपये दिले होते.
250 रुपयात पूजेसाठी सामान, अभिषेकसाठी दुध घेतलं.250 पुजार्याची दक्षिणा बाजूला काढून ठेवली.
पोरगं दुधाची पिशवी बघून जास्तच कोकलायं लागलं, तसं तिने पिशवी पदराआड दडवली.एक दिवस पोरगं उपाशी राहिलं तर मरणार नाही.पण ही साडेसाती त्याचा जीव घेतल्याशिवाय कशी राहील?
पण पोरगं ऊन्हानं अन् भुकेने कळवळून रडत होतं.आईचं काळिज फाटत होतं पण ती स्वतःच स्वतःला दिलासा देत होती..ही शांती तुझ्यासाठीच करतेय रे लेकरा..पूजा झाली की प्रसाद खाऊ घालते अन् माझा बी शनिवार सोडते.
ऊन आता पार डोक्यावर आले होते.
एकदाचं मंदिर गाठलं. आतल्या नळावर तिनं हातपाय धुतले,पोराच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. एकदम थंडगार वाटलं..तिनं देवाला नमस्कार केला..
पुजार्याला आवाज दिला.पुजारी जेवत होता.पाटलांच्या घरुन आताच शिधा आली होती.पुजार्याने तिथूनच तीला सांगितलं, "माई, थोडा वेळ लागेल. देवाची विश्रांतीची वेळ आहे.
अर्धा तासाने करू अभिषेक अन् पूजा.
तू तोपर्यंत आराम कर."
तिने लेकराकडं पाहिलं, ते पार भेळकांडून गेलं होतं. तिच्या बी पोटात कावळे ओरडत होते..
तिनं हात जोडून पुजार्याला विनवणी केली,"लेकरू लय भुकाजून गेलंय महाराज, पूजा झाली असती म्हणजी प्रसादाचं दोन घास त्याला खाऊ घातलं असतं."
"अगं माई, तुझ्या लेकरा पायी मी देवाची झोपमोड करू काय? देवाच्या कार्याला थोडी कळ सोसावीच लागते,थांबायचं असेल तर थांब नाही तर पुढच्या शनिवारी ये",पुजारी ताटावरूनच तणतणला.
तिनं हात जोडलं, "नाही महाराज, मी थांबते. देवाच्या झोपमोडीचं पाप माझ्या माथी कशाला?" अन् लेकरापाशी जाऊन बसली.
ऊन उतरणीला लागलं होतं..
दोन तास उलटून गेले होते, लेकरू भुकेने कासावीस होऊन झोपी गेले होते. देवाची झोप होईपर्यंत पुजार्याने सुद्धा वामकुक्षी घेतली.तिचा बी डोळा लागला होता.
पुजार्याने हाक दिली तशी तिला जाग आली.पुजार्याने पुजेचं सामान घेतलं, अभिषेकाचं दूध घेऊन अभिषेक केला, उरलेले दूध देवासाठी ठेवून दिले. पूजेचा अर्धा नारळ तिला दिला तिनेही भक्तीभावाने शनीच्या अन् पुजार्याला नमस्कार केला आणि 250 रुपये व कवटीचा रुपया मिळून एकूण 251 रुपये दक्षिणा पुजार्याच्या हातावर ठेवली. पुजार्याने तीला प्रसाद दिला आणि शांती झाल्याचं सांगितले.
प्रसाद घेऊन लगबगीने ती लेकराकडं गेली..लेकराला हाका मारल्या, हलवले पण ते मात्र थंडगार निपचित पडले होते, भुकेने आणि उष्माघाताने त्याचा बळी घेतला होता.
तिने मोठ्याने टाहो फोडला. तिच्या हंबरड्याने मंदिराचा गाभाराही गलबलून गेला. पुत्रवियोगाच्या अतीव दु:खात तिनंही तिथेच प्राण सोडला.....
एक प्रश्न मात्र उरला तसाच अनुत्तरीत, शांती नेमकी कुणाची झाली? शनीची, पुजार्याची का तिच्या लेकराची......
देवावर श्रद्धा असावी.....अंधश्रद्धा नसावी..
आवडली तर नक्की शेयर करा.....♥♥
एक प्रियकर.........♥
♥♥♥........MJare-REHNA HAI TERE DIL MEIN.......♥♥♥
(आवडले तर नक्की लाईक करा..)
↓↓ ♡ ♤ ◇ ♧ ↓↓
↓↓ℓιkє♤ѕнαяє♤ℓιkє↓↓
_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)
https://m.facebook.com/profile.php?id=379108762245849&refid=52&__tn__=Cwhatsapp #group_join.
9604672074