-महावीर सांगलीकर
.... दुसऱ्याच दिवशी त्यानं आपल्या एका मित्राला गाठलं आणि आपली समस्या सांगितली.
‘तुझं लग्न झालाय अशी थाप तू मारलीस हे कळू शकतं, पण तुला एक छोटी मुलगी आहे अशी एक्स्ट्रा थाप का मारलीस?’
‘ते तोंडातनं निघून गेलं. पण त्यामुळं जोशी बाईला खरंच पटलंय की माझं खरच लग्न झालंय म्हणून’
‘एक आयडिया आहे,’ मित्र म्हणाला, ‘तू पुण्यात एखादी तरुण सिंगल मदर शोध आणि तिच्याशी लग्न करून टाक. बायको आणि मुलगी दोन्ही मिळेल तुला. गावी जाऊन लग्न करून येता आलं असतं तुला, पण तसं केलंस तर लहान मुलीचं काय करणार?’
‘सिंगल मदर? हे काय असतं?’ सुनीलनं विचारलं.
‘अरे बाबा, समाजात अशा कांही तरुणी असतात की ज्यांचा डायव्हर्स असतो, त्यांना एखादं मूल असतं आणि तरुणी आपल्या मुलाचा किंवा मुलीचा सांभाळ करत जगत असतात. कांही तरुणी अशा पण असतात की ज्यांचं लग्न झालेलं नसतं पण त्यांना एखादं मूल असतं,’ मित्रानं त्याला माहिती दिली.
‘नको बाबा तसली कांही भानगड. आणि मला लगेच लग्न पण करायचं नाही. त्याच्यापेक्षा मी पेपरला ‘शेअरिंग बेसिसवर वर्किंग वूमनसाठी फ्लॅट उपलब्ध आहे’ अशी जाहिरात देऊन बघतो’
‘अरे बाबा, पण लहान मुलीचं काय?’
‘खोटी खोटी बायको मिळाली तर छोटी मुलगी पण मिळवता येईल कोठून तरी. नाहीतर मुलगी गावीच राहणार आहे असं सांगता येईल'
मग सुनिलनं पेपरला तशी जाहिरात दिली. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर सकाळी सकाळी 9.30 वाजता त्याला पहिला फोन आला. पलिकडंनं गोड आवाज आला,
‘तुमची जाहिरात वाचली आजच्या पेपरला. शेअरिंग बेसिसवर फ्लॅट मिळेल म्हणून. किती मुली ठेवणार आहात तुम्ही?’
‘एकच’ त्यानं सांगितलं.
‘एकच? पण तुम्ही तर शेअरिंग बेसिसवर असं लिहिलंय’
‘मी आहे ना शेअर करायला’
तिकडून फोन कट झाला.
नंतर आणखी चार फोन आले. प्रत्येक वेळी तेच डायलॉग आणि फोन कट.
त्यानं ठरवलं, आता खरं खरं काय आहे तेच सांगायचं.
तेवढ्यात त्याला आणखी एक फोन आला.
‘तुमची जाहिरात वाचली पेपरमध्ये....’
‘होय, मीच दिलीय जाहिरात. पण माझ पूर्ण ऐकून घेणार का? महत्वाचं आहे म्हणून विचारतो. आय नीद युवर हेल्प’
‘बोला, मी काय मदत करू शकते?’
त्यानं त्याची सगळी कथा ऐकवली.
‘छान!’ तिकडून आवाज आला, ‘पण तुमचं वय किती आहे?’
‘अठ्ठावीस वर्षे’
‘मला तुमच्या या नाटकात भाग घ्यायला आवडलं असतं, पण...’
‘पण काय?’ त्यानं अधीर होऊन विचारलं.
‘पण माझं वय पंचेचाळीस वर्षे आहे... मिस मॅच. सॉरी, मी तुमच्यासाठी कांही करू शकत नाही. प्रयत्न करत रहा, यश मिळेल. बेस्ट लक’ असे म्हणत त्या बाईंनी फोन ठेऊन दिला.
पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/10/blog-post.html