‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’
‘का चेंज करायचं आहे?’
‘मला नाही आवडत माझं नाव...’
‘आपलं नाव न आवडणाऱ्या व्यक्ति फारशा असत नाहीत. यू आर वन ऑफ सच अ रेअर केसेस... बाय द वे, काय नाव आहे तुझं?
‘अंजली!’
‘अंजली....? हे नाव तुला आवडत नाही? कमाल आहे! इतकं चांगलं नाव मिळायला नशीब लागतं... किती म्युझिकल आहे हे नाव! डोळे झाकून ऐकावं असं! तुला ते का आवडत नाही हे तू सांगू शकशील का?’
‘नाही आवडत.... का ते सांगता येत नाही मला’
‘ठीक आहे. मी सुचवीन तुला दुसरं एखादं नाव. पण ते तुझ्या अंजली या नावाएवढं चांगलं असणार नाही. तुझी जन्मतारीख सांगशील का?’
‘8 एप्रिल 1986’
‘ओह... म्हणजे जन्मांक 8, भाग्यांक 9. . ग्रेट!'
'ग्रेट नाही सर. हे अंक ग्रेट नाहीत. मी वाचलंय'
'हे बघ अंजली, कोणतेही अंक वाईट नाहीत. प्रत्येक अंकात खूप कांही चांगलं असत. तुला मिळालेले हे दोन अंक तुला महान बनवू शकतात. तुझं अंजली हे नाव या अंकांची निगेटिव्ह बाजू कमी करते'.
'हे मला माहीत नव्हतं'
'तुला तुझ्या अंजली या नावाचा अर्थ माहीत आहे का?’
‘नाही....’
‘हे बघ, अंजली म्हणजे ओंजळ. तुम्ही जेंव्हा एखादी गोष्ट दोन्ही हातानी मनापासून वहाता, अर्पण करता तेंव्हा अंजली हा शब्द वापरला जातो. देवाला फुले वहाताना ती ओंजळीतून वाहिली जातात. भावांजली, कुसुमांजली, पुष्पांजली वगैरे शब्द तुला माहीत आहेतच.
पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/03/blog-post_21.html