-महावीर सांगलीकर
सोनाली माझी बालमैत्रीण. बालमैत्रीण म्हणजे मी लहान होतो तेंव्हापासूनची मैत्रीण नव्हे, तर ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे म्हणून.... माझ्या दृष्टीनं माझी बालमैत्रीणच. म्हणजे मी तिच्या वयाचा होतो त्यावेळी तिचा जन्म झाला असावा. असो.
माझी तिच्याशी ओळख मी एकदा नवोदय विद्यालयात कांही कामासाठी गेलो होतो त्यावेळी झाली. तिथं गेल्यावर मी प्यूनकडं माझं कार्ड दिलं आणि म्हणालो, प्रिन्सिपॉल मॅडमना भेटायचं आहे. तो लगेच मॅडमच्या केबिनमध्ये गेला. मिनिटाभरातच बाहेर आला आणि म्हणाला, तुम्हाला बोलावलंय आत.
मॅडमना भेटून मी माझं काम सांगितलं. त्या म्हणाल्या, तुम्ही पाटील मॅडमना भेटा. त्या तुमचं काम करू शकतात. स्टाफरूममध्ये असतील आता.
त्यांनी बेल वाजवून प्यूनला बोलावून घेतलं. त्याला म्हणाल्या, यांची पाटील मॅडमशी गाठ घालून दे.
प्यून मला स्टाफ रूमकडे घेऊन गेला. स्टाफरुमच्या बाहेरूनच तो म्हणाला, पाटील मॅडम, तुमच्याकडं कुणीतरी आलं आहे.
पाटील मॅडम पटकन बाहेर आल्या.
मला बघताच म्हणाल्या, ‘सर तुम्ही? माझ्याकडं? तुम्ही माझ्याकडं कसं काय?’
‘तुम्ही मला ओळखता?’ मी आश्चर्यानं म्हणालो.
‘सर मी तुमची फॅन आहे. तुमच्या कथा वाचते मी नेहमी. तुमचा फोटो पाहिलाय मी नेटवर... पण तुम्ही माझ्याकडं कसं काय?’
‘प्रिन्सिपॉल मॅडमनी पाठवलंय मला तुमच्याकडं. पाटील मॅडम, माझं एक काम होतं महत्वाचं तुमच्याकडं.’
‘अहो सर, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तुम्ही मला अहो जाहो करू नका. आणि मला पाटील मॅडम म्हणू नका. माझं नाव सोनाली आहे’
‘ठीक आहे. काम असं होतं की मी एक हिंदी पुस्तक लिहिलं आहे. माझी हिंदी चांगलीच आहे, पण माझं व्याकरणाशी वावडं आहे. म्हंटलं हिंदी शिकवणाऱ्या कुणातरी हुशार शिक्षिकेकडनं तपासून घ्यावं. आता मराठी शाळेत हिंदी शिकवणाऱ्या शिक्षिकेकडून ते तपासून घेण्यापेक्षा हिंदी मेडियमच्या शाळेतील शिक्षिका त्या कामासाठी जास्त योग्य, म्हणून मी नवोदय विद्यालयात यायचं ठरवलं. मग प्रिन्सिपॉल मॅडमनी तुमचं... सॉरी तुझं नाव सुचवलं’
ही सोनाली दिसायला सुंदर, डोळ्यात तेज असणारी, आकर्षक होती.
पुढं तिनं मी पुस्तकासाठी लिहिलेला मजकूर ठरलेल्या वेळेच्या खूपच आधी तपासून दिला. त्यावेळी ती म्हणाली, ‘सर तुमचं हिंदी फारंच चांगलं आहे. व्याकरणाच्या थोड्या चुका आहेत, त्या मी दुरुस्त केल्या आहेत. पण मला एक शंका येतेय सर. तुमचं माझ्याकडं हे खरं काम नव्हतं..... खरं ना?’
‘ओळखलंस...? छान’
पूर्ण कथा पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/07/blog-post.html