लघुकथा: दिनकरचं लग्न -महावीर सांगलीकर
दिनकर कदम लवकरच कामावर रुजू झाला. त्याचं पोस्टिंग पुणे ग्रामीण विभागात झालं. थोड्याच दिवसात त्यानं आपला दरारा निर्माण केला. त्याची प्रतिमा तरुण तडफदार, गुन्हेगारांचा कर्दनकाळ, पीडितांना न्याय मिळवून देणारा, गरजूंना मदत करणारा, आपल्या कामात राजकारण्यांची ढवळाढवळ खपवून न घेणारा अशी झाली. पण या दिनकरची फिलॉसॉफी इतरांच्यापेक्षा वेगळीच होती. तो पैसेही बरेच गोळा करत असे. कुठं पैसे घ्यायचं आणि कुठं घ्यायचं नाहीत याचे त्याचे स्वत:चे नियम होते. गुन्हेगार कोण आहे ते माहीत आहे, पण पुरावे नाहीत आणि केस कोर्टात टिकणार नाही हे लक्षात आलं की तो त्या गुन्हेगाराकडनं भरपूर पैसे उकळत असे. पण भक्कम पुरावे असतील तर तो त्या गुन्हेगाराच्या विरोधात कोर्ट केस दाखल करत असे. अशी केस की तो गुन्हेगार सुटलाच नाही पाहिजे.
वरकमाईचे तो तीन हिस्से करत असे. एक हिस्सा त्याच्या स्वत:च्या खर्चासाठी, दुसरा खबऱ्यांना देण्यासाठी आणि तिसरा गरजूंना मदत करण्यासाठी. असो. आपला हा विषय नाही. त्याचं लग्न आणि ते झाल्यावर मिडियात झालेली चर्चा हाच या कथेचा विषय आहे.
एकदा तो गावी गेला असताना आबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. त्यावर दिनकर म्हणाला, ‘आबा, मला जाईबरोबर लग्न करायचं आहे. आबा म्हणाले, ‘’म्या ऐकलंय जाईबद्दल. काय करतीया म्हणं ती?’
‘ती बॅंकेत क्लार्क आहे’
‘आणि बाप काय करतो तिचा?’
‘ते पोस्टात होते. रिटायर झालेत’
‘हे बघ, त्या जाईबरोबर लग्न करून तुला काय मिळणार हाय? तिचा बाप काय देणार हाय व्हय?’
दिनकर कांही बोलला नाही.
आबा म्हणाले, ‘आमदार बापूसाहेब पाटील माहीत हायतच तुला. त्यांची पोरगी लग्नाची हाय. एकुलती एक. तिला भाऊ नाय आणि बहिण पण नाय. चांगली शिकलीया. तिच्याबरुबरच लग्न करायचंय तुला. तिच्या बापाचं सगळं तुलाच मिळणार हाय पुढं. उद्या जाऊया पोरगी बघायला’
आता आबांच्या पुढं नाही म्हणणं दिनकरला शक्यच नव्हतं. शिवाय तो आबांच्यासारखाच एकदमच प्रॅक्टिकल विचार करणारा होता. भंकस आदर्शवादापासून दूर असलेला. आपल्या झटपट प्रगतीसासाठी बापूसाहेबांची मुलगी निमित्त बनणार असेल तर हा चान्स कशाला सोडायचा?
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचावी:
http://mahaakatha.blogspot.in/2016/10/blog-post.html++++