msanglikar

-महावीर सांगलीकर

‘हनमंता, तुला माहित आहे का, त्या लोकांनी लव्ह जिहाद सुरू केला आहे आपल्या लोकांच्या विरोधात’
‘म्हणजे काय?’ हनमंतानं न कळून विचारलं.
‘म्हणजे त्यांची पोरं आपल्या पोरींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यांना पळवतात आणि त्यांच्याशी लग्न लावतात. त्यांचा धर्म बदलतात. ’
‘पण आपल्या पोरी त्यांच्या जाळ्यात अडकतातच कशा?’ हनमंतानं विचारलं.
त्याला उत्तर मिळालं नाही.
मग त्यानंच विचारलं, ‘बरं ठीक आहे... ते लोक चुकीची गोष्ट करत आहेत. पण मग आपण काय करायला पाहिजे?’
‘माझ्याकडं एक आयडिया आहे’
‘काय?’
‘आपण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवायचा’
‘म्हणजे?’
‘म्हणजे आपण पण त्यांच्या पोरींना आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्याशी लग्न करायचं. जशाला तसं उत्तर द्यायलाच पाहिजे.’
हनमंताला ही गोष्ट कांही फारशी पटली नाही. तो म्हणाला, ‘पण आपल्यात कोण तयार होणार असल्या गोष्टी करायला?’
‘दुसरं कुणी तयार होऊ दे न होऊ दे, आपणच सुरवात करुया. एकदा का आपण लव्ह जिहाद सुरू केला की आपल्या बाकीच्या तरुणांना पण प्रेरणा मिळेल’
‘ठीक आहे, पण आधी आपण गुरुजींना  विचारलं पाहिजे. त्यांनी परवानगी दिली की आपण हे सगळं करायला हरकत नाही’
‘अरे नको. गुरुजींच्याकडे आपण आपलं काम फत्ते झालं की मगच जायचं. सरप्राईझ द्यायचं त्यांना. ते खूष होतील. त्यांची परवानगी घेत बसलो तर ती एक तर मिळणार नाही, आणि मिळालीच तर पुढं  आपलं काम फत्ते झालं नाही तर ते नाराज होतील. त्यापेक्षा आपण हे सगळं परस्पर करुया. यशस्वी झालो तर गुरुजींची शाबासकी आणि काम नाही झालं तर त्यांना कांहीच कळणार नाही’
‘ठीक आहे. करुया. आधी कुणी करायचं?’
‘आपण तिघांनी एकदमच सुरवात करुया. पण तू आमच्यापेक्षा थोडा मोठा आहेस. म्हणून पहिलं पाऊल टाकायचा मान तुला’
मान मिळाल्यानं हनमंता भलताच खूष झाला. त्या खुशीतच तो म्हणाला, ‘पण त्यांची पोरगी कशी शोधायची?’
‘कशी म्हणजे? आपण रोज दर्ग्याकडे फिरायला जाऊ. मिळेल एखादी. आणि आपल्या कॉलेजमध्ये पण आहेत की भरपूर त्यांच्या मुली. तुला बघ कोण आवडते ती’
क्षणभर विचार करून हनमंता म्हणाला, अरे ती आपल्या कॉलेजमधली आयेशा कशी राहील? माझी तिच्याशी मैत्री पण आहे चांगली. आता तिलाच जाळ्यात ओढतो माझ्या’
‘अरे वा! खूप छान!’
दुसऱ्या दिवसापासनं हनमंता कामाला लागला. कॉलेज सुटल्यावर आयेशा लायब्ररीत गेली. हनमंता तिच्यावर वॉच ठेऊनच होता. पाच मिनिटांनी तोही लायब्ररीत गेला. तिथं ती एका कोपऱ्यात पुस्तक वाचत बसली होती.
‘हाय आयेशा!’
‘बोल हनमंता’
‘अगं मला हनमंता म्हणत जाऊ नकोस. मला आवडत नाही ते’
‘ओ.के. ... पण मग काय म्हणायचं तुला’
‘तूच ठरव’ तो डोळे मिचकावत म्हणाला.
‘हनु...?’ ती विचार करत म्हणाली, ‘पण तू माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म करू नको.. नाहीतर मला ‘आये’ वगैरे म्हणशील’ ती पण आपले टपोरे, काजळ घातलेले डोळे मिचकावत म्हणाली.
तो खदा-खदा हसला.
‘बरं बोल... काय म्हणतोस?’ तिनं विचारलं
‘कांही नाही.... बोलावसं वाटलं तुझ्याशी’
‘मग बोल ना...’
आत्ता लगेच डायरेक्ट प्रेमाचं बोलणं बरोबर ठरणार नव्हतं. त्यामुळं तो म्हणाला, ‘आत्ता नको... मी नंतर बोलेन तुझ्याशी’
‘बरं, बोल नंतर... मला पण आत्ता जरा नोट्स काढायच्या आहेत’ असं म्हणत ती पुस्तक वाचू लागली.
तो म्हणाला.. ‘आता तू वाचत बस, मी जातो. रात्री मी तुला एक मेसेज पाठवीन whats app वर. तो वाचून रिप्लाय दे प्लीज..’
‘ओ.के., देईन’

रात्री तिला काय मेसेज पाठवायचा याचा तो विचार करत होता. खूप डोकं खाजवल्यावर त्याला एक मेसेज सुचला......

पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/11/blog-post_30.html


simran254

Re: मराठी लघुकथा: लव्ह जिहाद
« Reply #1 on: June 24, 2022, 11:00:19 AM »
 मराठी कथा, मराठी गोष्टी ,Marathi Goshti, Marathi katha , Marathi stories ,