Vinit Dhanawade

Wrong Number…!! ( ( भाग दुसरा )
« on: December 27, 2014, 12:25:28 PM »
अक्षता तशीच उभी होती मोबाईलकडे पाहत…डोळ्यातून पाणी. काकूंना काही समजण्यापलीकडे. " काय झालं अक्षता… ? कशाला रडतेस ? काही प्रोब्लेम आहे का ? " , अक्षता तरी गप्पच. काही वेळ असाच गेला. काकूंनी अक्षताला त्यांच्या रूममध्ये आणलं. " हं… बोल आता… रडू नकोस… मला कसं कळणार काय झालं नक्की ते. ", अक्षताने डोळे पुसले, घोटभर पाणी घेतलं. शांत झाली. आणि काकूंना सगळी स्टोरी सांगितली.
 " त्या आजी, तुझ्या ओळखीच्या होत्या का ? " ,
" नाही. " ,
" मग आता काय करणार तू … ? " ,
" काय करू ते कळत नाही." ,
" तो रस्ता मला सुद्धा माहित आहे. तिथे खूप traffic असते. आणि त्या गोलाकार बागेजवळ तर अपघात तर जवळपास नेहमीचाच. शिवाय तू बोललीस , त्या आजींना रात्रीचं दिसत नाही बरोबर. ",
" हो ना… त्या कश्या जातील घरी आता.… काकू… " ,
" खरंच गं… " ,
" आणि त्या फोन पण करत असतील मला, माझा फोन तर बंद आहे.",
" मग लाव ना charging ला फोन. " ,
" तरीसुद्धा फोन चालू होण्यासाठी वेळ लागणारच काकू… " दोघीही विचार करत बसल्या.

" आता एकच पर्याय उरला आहे, अक्षता. " ,
" कोणता ? " ,
" जे काही झालं ते विसरून जा आता. " अक्षता काकूंकडे बघत राहिली.
 " कसं काय काकू ? त्या तिकडे हतबल होऊन फिरत असतील, वयस्कर बाई… रात्रीचं दिसत नाही त्यांना, घरी जायचं आहे पण रस्ता माहित नाही. फक्त मुलाच्या ओढीने त्यांना अजून घरी जायचे आहे. आणि तुम्ही बोलता विसरून जा… शक्य नाही ते. ",
" मग तू काय करणार आहेस ? त्यांच्याकडे एकच option होता. तुझा मोबाईल नंबर आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या घरी जायला निघाल्या होत्या. आता तुझा मोबाईल तर बंद आहे. मग त्या काय करणार आता ? . " ,
" म्हणजे … मला काही कळत नाही , तुम्ही काय बोलत आहात ते. " ,
 " यात त्यांच्या मुलाची चुकी तर आहेच,  परंतू तुझी पण चूक आहे. " ,
" माझी ? " ,
" हो… तुझी चूक आहे… तू जर तेव्हाच त्यांना सांगितलं असतेस ना कि तुम्ही जिकडे असाल तिकडेच थांबा, तर बंर झालं असतं. " ,
 " कसं काय ? " ,
" तो Area निदान त्या आजींसाठी तरी safe होता. कदाचित त्यांचा मुलगा त्यांना शोधत आला असता तिथे. " काकूंचं बोलणं बरोबर होतं. मी आजींना तिथेच थांबायला सांगितलं असतं तर फार बऱ झालं असतं. आपलीच चूक आहे. अक्षता दुःखी झाली. 

तशीच ती मोबाईल हातात धरून बसली होती. " काय करणार तू आता अक्षता ? ",  अक्षता विचार करत होती तशीच. " चल. मी चहा करते आहे, घेतेस का तुही ? " . अक्षता तशीच बसली होती. अचानक तिच्या मनात आलं काहीतरी… ती उठली आणि तशीच बाहेर पडली. तश्या काकू तिच्या मागून गेल्या. " अक्षता… अक्षता… कूठे चाललीस ? " , विचारेपर्यंत ती जिना उतरून खाली पोहोचलीही. काकूंचा आवाज ऐकून अक्षता थांबली.
 " कूठे चाललीस तू ? " ,
 " आजींना त्यांच्या घरी सोडायला जाते आहे मी. " ,
 " तुला काय वेड लागले आहे का ? तू बरोबर विरुद्ध दिशेला आहेस आणि आता त्या कूठे असतील ते सुद्धा तुला माहित नाही. " ,
" तरीसुद्धा मला जावेच लागेल, आजींसाठी. त्यांना मला शोधावंचं लागेल, काही झालं तरी. " काकू गप्प झाल्या.
" ठीक आहे , पण अशीच जाऊ नकोस. थांब जरा , मी येते लगेच. " म्हणत काकू वर घरात धावत गेल्या. आणि लगेच हातातून त्यांचा मोबाईल घेऊन आल्या.
" घे… हा माझा मोबाईल घेऊन जा. " ,
 " नको काकू… " ,
" नको कशाला, घे… आणि तुझा मोबाईल मी charging ला लावते. " ,
" आणि तुम्हाला नको का मोबाईल . " ,
 " नको… तसे कोणाचे call येत नाहीत. ठीक आहे ना ? " ,
" चालेल , Thanks काकू… तुम्ही माझा मोबाईल charging ला लावा आणि त्या आजींचा call आला पुन्हा तर तुम्ही मला call करा तुमच्या मोबाईल वर " ,
" चालेल चालेल  आणि काही समजलं तर तू मला call कर , घरच्या फोन वर. आणि तिथे कशी जाणार आता ? " ,
" बघते, रिक्षाने जाते, लवकर पोहोचीन तिकडे." ,
" जा लवकर आणि आजींना घरी पोहोचलोस कि मला call कर "," नक्की " म्हणत अक्षता धावत गेली.

(पुढे वाचा….
 http://vinitdhanawade.blogspot.in/2014/12/wrong-number_26.html

आवडली तर नक्की share करा.  )
Thanks & Regards,

Vinit R. Dhanawade.

simran254

Re: Wrong Number…!! ( ( भाग दुसरा )
« Reply #1 on: June 24, 2022, 10:42:50 AM »
 मराठी कथा, मराठी गोष्टी ,Marathi Goshti, Marathi katha , Marathi stories ,