anibani

छेदन बिंदू
अनिरुद्ध बनहट्टी
[/size]
आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. भरूचानं थोडं लवून अभिनंदनाचा स्वीकार केला आणि टाय नीट केल्यासारखं करून तो खुर्चीवर बसला. मेजाभोवती बसलेले इतर सात जण आता असूयेनं त्याच्याकडे पाहत होते. काही क्षणांपूर्वी याच सात जणांनी त्याचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलेलं होतं. टेबलाच्या टोकशी बसलेले वाटवे मॅनेजिंग डायरेक्टर देशपांडे आपला चष्मा काढून मेजावर उलटा ठेवत म्हणाले,
“मिस्टर भरूचा, कम हिअर प्लीज.” भरूचा उठून देशपांडेकडे गेला, तसा देशपांडेंनी शेजारचा पेपर-नाइफ उचलून त्याचा टाय धरून त्याला ओढलं आणि टाय कापून टाकला. टेबलाभोवती बसलेले इतर सातजण त्याच्या अर्ध्या टायकडे पाहून खदखदा हसले. भरूचाच्या मनात लहानपणाची शेपूट तुटक्या कोल्ह्याची गोष्ट घुमत राहिली आणि तो दचकून जागा झाला. तो आपल्या अंथरूणावरच होता. शेजारी सुजाता झोपली होती. गाढ एअरकंडिशनर अगदी व्यवस्थित सुरू होता. त्याच्या घशाला कोरड पडली. भिंतीवरच्या घड्याळाचे रेडियमचे काटे चार वाजल्याचं दाखवत होते. एक वाजता त्याला झोप लागली. बारापर्यंत तर पार्टीच सुरू होती. हल्ली सारखी अशी स्वप्नं पडायची घशाला कोरड पडून जाग यायची. पुन्हा सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेलं पाहिजे असा विचार करत त्यानं शेजारच्या टेबलावरचा ग्लास उचलला आणि घोटभर पाणी पिऊन प्लास्टिकच्या ताटलीनं पुन्हा झाकून ठेवला. हे सायकिअ‍ॅट्रिस्टचं लफडं दोन महिन्यापासून सुरू झालेलं होतं. त्याला डावलून आपटेला ज्या विषयी प्रमोशन मिळालं होतं. त्या दिवसापासून. त्या दिवशी तो आपली एअरकंडिशंड कार चालवत घरी परत येत होता तेव्हा त्याचं सिग्नलच्या लाल दिव्याकडे लक्षच गेलं नाही. तो सरळ डावीकडे वळून एका टॅक्सीवर जाऊन धडकला. पोलिसाच्या शिट्टया वाजल्या. तो कार बंद करून बाहेर येऊन उभा राहिला. त्याला स्वतःचं नाव देखील आठवेना. त्याचं मन पूर्ण कोरं झालं होतं. तो आश्‍चर्यानं अवतीभवती पाहत होता. त्याला भानावर यायला दहा एक मिनिटं लागली. पोलिसाला पैसे चारून आणि टॅक्सीवाल्याला भरपूर भरपाई देऊन त्यानं नंतर सुटका करून घेतली. पण तो मन कोरं असलेली दहा मिनिटं त्याच्या स्मरणशक्तीतून कायमची निसटली. त्या रात्री त्याला त्याच्या मुलाच्या, राहुलच्या कारचा अपघात झाल्याचं स्वप्न पडलं आणि तो रडत रडत जागा झाला. सुजाता आणि राहुलनं त्याला समजावलं तरीही ते स्वप्न होतं हे त्याला पटेचना. मग त्यानं आठवडाभर रजा घेतली आणि एका चांगल्या मनोविकार तज्ज्ञाकडून उपचार सुरू केले तेव्हा तो रूळावर आला.
आजकाल झोप चांगली लागायची. पण आठवड्यातून एखादा दिवस पूर्ण रात्र जागून काढावी लागायची आणि विचित्र, असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी स्वप्नं पडायची .
“हळू हळू सुधारेल. मी दिलेली औषधं घेत रहा, हळूहळू स्वप्नरहित झोप यायला लागली की औषध कमी करत करत बंद करू.” सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणाला होता.
आणखी एक घोट पाणी पिऊन भरूचा पुन्हा झोपला.
***
लहानपणापासून सवय असल्यामुळे खोपटाच्या अगदी पायर्‍यांखालून वाहणार्‍या काळ्या गटाराचा खास मुंबईचा वास खोपटात भरून उरला होता, डास घोंघावत होते, खोपटाशेजारून एक वाजेपर्यंत धडाड धाड धडाड् धाड् करत लोकल्स जात होत्या, तरीही रमेश रात्री दहा वाजताच झोपून गेला होता. त्याचा बाप सेंट्रॉन मिलमध्ये कामगार होता आणि आई कचरा गोळा करायची. त्यामुळे झोपडपट्टीतल्या सुस्थितीतल्या कुटुंबांपैकी त्याचं कुटुंब समजलं जायचं. बाप कधी कधी दारू पिऊन यायचा पण त्याच्या आईला मारहाण कधी करायचा नाही. रमेश सकाळपासून फुटपाथवर पेनं विकायचा आणि दुपारी बारा वाजता धंदा आवरता घेऊन शाळेत जायचा. तो आठवीत होता. त्याच्या चेहर्‍यावर स्मित उमटलं. तो स्वप्नात अनिल कपूर सारखा बडा दादा झाला होता आणि लहान पोरांना पैसे वाटत गाणं म्हणत होता. शाळेतल्या मास्तरचा चष्मा त्यानं काढून घेतला आणि धोतरवाल्या मास्तरचं काम करणारा असरानी त्याच्यामागे पळायला लागला. एवढ्यात स्वप्नाचे रंग बदलले. रंगीत स्वप्न काळं-पांढरं झालं. सगळीकडून लोक वेड्यासारखे पळत सुटले. ती त्यांचीच झोपडपट्टी होती. चार जीप्स येऊन थांबल्या आणि खाकी कपड्यातले पोलिस लाठ्या घेऊन म्हातारेकोतारे, लहान मुलं, बायका काही न बघता पिसाटासारखे सगळ्यांना झोपडत सुटले. सैरावैरा पळताना तो देखील त्यांच्या तावडीत सापडला आणि त्याच्या पायांवर सप्सप् वेदनांचे जाड दंडगोल उमटले.
पाय ठणकतायत अशी भावना होऊन रमेश उठला. तो घामाघूम झाला होता. बरोबर दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या झोपडपट्टीत रेड झाली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या स्वप्नांचा हाच शेवट व्हायचा आणि घामाघूम झालेला रमेश उठायचा. दोन महिन्यांपूर्वी खाल्लेल्या लाठ्यांचे वण ठणकताय्त असं त्याला वाटायचं. त्याला परसाकडे लागायची. आताही त्याला परसाकडे लागली. तो टमरेल ..... गटाराच्या कडेनं आपल्या नेहमीच्या पासर्‍यांसारख्या दोन दगडात जाऊन बसला. चार- सतराची लोकल धाड धाड करत रोजच्या सारखीच शेजारच्या रूळावरून धावत गेली.
***
साडे सहा वाजता गाढ झोपलेल्या भरूचाला सुजातानं हलवून उठवलं. डोळे चोळत भरूचा उठला. कालचा .... फॉर्मल्डिहाईट होऊन आता डोक्यात सणकत होतं. त्यानं पलंग शेजारच्या मेजावरच्या डबीतली एक गोळी घेतली. सुजातानं आणलेला गरम चहा दोन कप घेतला. साखर नसलेला. तेव्हा त्याला .... पोटात हालचाल जाणवली. तो टॉयलेटला जाऊन आला. किचनमधून अंडी, ब्रेड, बटरचा वास येत होता. त्यानं नाईलाज झाल्यासारखा इंपोर्टेड कोलगेटच्या निळ्या जेलनं दात घासले आणि नॅपकिन तोंड पुसत तो किचनमध्ये गेला.
“राहुल काल रात्री घरी आला नाहीय,” सुजाता म्हणाला फोनची घंटा वाजली. भरूचा फोनपाशी गेला. राहुलचा फोन होता.
“हॅलो डॅउस्.’
‘हॅलो’
‘काल पप्पूचा बर्थडे होता. जरा जास्त घेतली. तो आय ड्रीम ट वाइज नॉट टु ड्राईव्ह. इथेच झोपलो. आता इथूनच कॉलेजला जाईन.”
“ओके बॉय” भरूचा म्हणाला, “बट डोंट मेक इट प्रॅक्टिस!”
“कोर्स नॉट डॅड.”
फोन ठेवून भरूचा किचनमध्ये आला. हाफ फ्राय अंड्याचे प्रचंड पिवळे डोळे त्याच्याकडे पाहत होते.
“राहुलचा फोन होता,” तो सुजाताकडे पाहत म्हणाला, “पप्पूकडे झोपला होता तो.” खुर्चीव र बस अंड्याच्या पिवळ्या बलकात ब्रेड बुडवत त्यानं सुजाताला विचारलं, “हा पप्पू कोण? तुला माहीत आहे का?”
“दोन-तीनदा घरी आला होता. मला तर अ‍ॅडिक्ट व..... सुजाता काळजीच्या स्वरात म्हणाली. भरूचा दोन पिढ्यां मुंबईला गेल्यानं मातृभाषा मराठीच झालेली होती. तरी .............. भरूचा प्रयत्नपूर्वक विचार थांबवले. ब्रेकफास्ट संपवून ऑफिसची तयारी केली आणि आपल्या एअरकंडिशन्ड गाडीत बसून तो ऑफिसला निघाला.
***
झाडा करून आल्यावर रमेश परत आपल्या परटावर ..... बाप आणि आई झोपलेलेच होते. आता पायाचे वण दुखण्या.... नाहीसा झाला आणि रमेशला विनस्वप्नांची गाढ झोप लागली. मध्ये पाच वाजता आई भांडी घेऊन फुटलेल्या पाइपवर पाणी भरायला गेल्याची अस्फुट जाणीव त्याला झाली पण तेवढीच. मग साडेसहाला त्याची झोप पूर्ण उघडली आणि त्यानं उठून आपलं परटं गुंडाळूत कोपर्‍यात उभं करून ठेवलं.
कोनाड्यातल्या डब्यातली मशेरी दातांना चोळून चोळून डोकु हल्लक झाल्यावर त्यानं टिपातल्या पाण्यानं खळखळून चुळा भरल्या आता खोपटात धूर भरला होता. बापदेखील उठून वाहत्या काळ्या पाण्याच्या लोंढ्यावर असलेल्या पासर्‍यांवर बसून आरामशीरपणे दातांना मशेरी चोळत बसला होता. हळूहळू धूर कमी झाला. आईनं हात घातली, “आवो, चूळ भर आता. च्या घ्या. ये रे रम्या.”
बापानं चूळ भरली आणि तो आणि रमेश चुलीपाशी गेले. तिघेजण कपभर गरम, गोड आणि खूप उकळलेला कडक चहा प्याले.
“काय रे रम्या,” बाप म्हणाला, “पैशे-बियशे पायजेल का” रमेश काहीच बोलला नाही.
बापानं कोपरीच्या खिशातून एक पन्नासची नोट काढून दिली.
“इेव. कापडं घे याची.”
रमेश बापाकडे पाहून स्वच्छ पांढर्‍या दातांनी हसला.
“वा, मला गेल्या परीक्षेत लयी मार्क मिळालेत.”
“अरे वा!” बापानं कोपरीतून आणखी एक पन्नासची नो सापडली.
“हे घे. माज्याकडून बकशीश.”
“आणि मला वो?” आई म्ळणाली.
“सगळा बोनस तुलाच दिला की काल.”
एक लोकल धडधडत त्याचं खोपटं थरथरत गेली. सात वाजून गेले. रमेशनं लोकलवरून अंदाज केला आणि कोपर्‍यातली फोल्डींग स्टँड, बॉलपेनची खोकी असलेली ताडपत्रीची पिशवी घेऊन तो कोपर्‍यावर आपलं दुकान लावायला निघाला.
***
“देशपांडे महाराष्ट्रीयन आहे म्हणून आपल्याला इलट्रीट करतो.” तरुणाच्या मनात सिग्नलला थांबल्यावर विचार आला. त्यानं खोल श्‍वासोच्छ्वास करून भरकटणारं मन थांबवलं. त्याचं लक्ष फुटपाथच्या कडेला बॉलपेनचं दुकान लावलेल्या, पांढरे स्वच्छ दात दाखवत सतत हसणार्‍या त्या काळसर मुलाकडे गेलं. त्याच्या-बॉलपेनच्या दुकानाआधी एक मुतारी होती आणि त्या मुतारीच्या आडोशाला चवड्यावर बसून चार जणाचं एक टोळकं गर्द ओढत होतं. एकेक जण सिगरेटची चांदी पाळीपाळीनं घेत होता. त्यावर पावडर टाकत होता आणि त्याखाली पेटती काडी धरून निघणारा धूर तोंडात धरलेल्या शंराच्या करकरीत नोटेच्या पुंगळीनं ओढून घेत होता आणि चौघांमध्ये राहुल? राहुलच होता तो! दोनजण झोपडपट्टीतले दिसत होते आणि इतर दोघे म्हणजे राहुल आणि पप्पू होते ! भरूचाला एकदम आपल्या घरी आलेल्या पप्पूचा चेहरा आठवला. सुजाताचा आवाज त्याच्या कानात घुमला, “दोन-तीनदा आला होता. मला तर अ‍ॅडिक्ट वाटला.”
एवढ्यात त्याचं गर्द ‘चेस’ करण संपलं. पप्पू आणि राहुल कडेला लावलेल्या, सिग्नशी संबंध नसलेल्या उलट्या रस्त्यानं जाण्यासाठी राहुलच्या कारमधे बसले. कारदेखील तीच होती. शंकाच नको. राहुलच होता तो. भरूचाला आपल्या मेंदूत कसलासा स्फोट झाल्यासारखं वाटलं. सिग्नलचा दिवा हिरवा झाला आणि यांत्रिकपणे गीअरमध्ये गाडी टाकून भरूचा पुढे निघाला. मग त्यांच्या मनावरचा त्याचा ताबा सुटला. कारच्या समोरच्या काचेत प्रतिबिंबांचे आणि दृश्यांचे तुकडे मिसळून गेले. टाय अर्धा कापलेला भरूचा नाचत नाचत त्याच्या छातीवर पाय देत आला. काय होतंय हे कळायच्या आत भरूचाची कार झिंगल्यासारखी डाव्या बाजूला फिरली आणि फुटपाथवरच्या कचकड्याच्या बॉलपेनाचं दुकान उधळून त्या दुकानामागे उभ्या असलेलया, आश्‍चर्यानं आ वासून आपले पांढरे स्वच्छ दात दाखवणार्‍या  त्या मुलाला खाली पाडून त्याच्या छातीत टायर रोवून उभी राहिली. फूटपाथवर चढलेल्या कारचा दरवाजा उघडून काहीही न कळणार्‍या नजरेनं भरूचा रक्ताच्या थारोळ्यात चिरडलेल्या कचकड्याच्या पेनांकडे पाहत राहिला. त्याचं मन पूर्ण कोरं होतं. आपण कोण हे देखील त्याला आठवत नव्हतं आणि मग त्या शहरातल्या दोन संस्कृतीच्या त्या छेदन बिंदूपाशी त्या शहरातल्या लोकांची गर्दी हळूहळू जमायला लागली.
***