msanglikar

-महावीर सांगलीकर

कोलंबोवरून चेन्नईला जाणारे विमान रावन्ना-2 च्या साथीदारांनी पळवले. त्यानंतर त्यांनी विमानाच्या आणि प्रवाशांच्या बदल्यात रावन्नाच्या सुटकेची आणि बी. भीषन्ना आणि विजया जयसिंहाला ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानंतर घडलेल्या विचित्र घडामोडी.....

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे हॉटलाईनवर बोलणे झाले. कांही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर रॉचा एक अधिकारी तातडीने दिल्लीवरून कोलंबोला रवाना झाला.

तिकडे कोलंबोतही श्रीलंकेच्या गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिका-यांची एक गुप्त मीटिंग झाली. या बैठकीला ए.एस.पी. विजया जयसिंहा देखील हजजार होती. त्या बैठकीत पोलीस अधिका-यांनी आपापली मते मांडली. रावन्ना-2 चा रिमांड काढून त्याच्याकडून विमान कोठे आहे याची माहिती मिळवता येईल असे मत एका अधिका-याने मांडले. त्याला सगळ्याच अधिका-यांनी दुजोरा दिला. पण गृहमंत्र्यांनी विमानातील प्रवासी हे महत्वाचे असून आपण रावन्ना-2ला लगेच सोडले नाही तर प्रवाशांना दगाफटका होऊ शकतो असे मत मांडले. त्यांच्या सुटकेसाठी हायजॅकर्सच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील असे सांगितले. या गोष्टीला कांही अधिका-यांनी पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला. विरोध करणा-या अधिका-यांना गृहमंत्री म्हणाले, ‘रावन्ना-2ला आपण परत पकडू शकू. पण सध्या प्रवाशांना वाचवणे हे महत्वाचे आहे. शिवाय आपल्या राष्ट्राध्यक्षांचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे मतही हायजॅकर्सच्या मागण्या मान्य करून प्रवाशांची सुटका करावी असेच आहे’

त्यावर ए.एस.पी. विजया जयसिंहा म्हणाली, ‘सर, ही माझ्यासाठी एक फार मोठी संधी आहे. मी रावन्ना-2 बरोबर तो नेईल तिथं जायला तयार आहे, अगदी आनंदाने. आणि मी तुम्हाला वचन देते सर, प्रवाशांची सुटका झाल्यावर मी त्याला परत कोलंबोच्या तुरुंगापर्यंत फरफटत आणेन’

मीटिंग संपताच रावन्ना-2च्या सुटकेची तयारी झाली. कोलंबोच्या विमानतळावर त्याच्यासाठी एक हेलीकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले होते. रावन्ना-2चा भाऊ बी. भीषन्नाला सगळी कल्पना देण्यात आली आणि त्याला बोलावून घेण्यात आले. ए.एस.पी.विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना दोघेही विमानतळावर हजर झाले. रावन्ना-2ही आला. तिथं तो पोलीस कमिशनरला म्हणाला, ‘मी माझे स्वत:चे हेलीकॉप्टर आणि माझा पायलट घेवून जाणार आहे’. रावन्ना-2 अशी मागणी करणार याची कमीशनरला शंका होतीच, आणि ती मागणी मान्य करण्यावाचून दुसरा कांही ऑप्शनही नव्हता. एवढ्यात आकाशातून एक हेलीकॉप्टर आले. ते रावन्ना-2चे होते. त्याला विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. हेलीकॉप्टर खाली उतरताच रावन्ना-2 तिकडे चालला. त्याच्यामागोमाग ए.एस.पी. विजया जयसिंहा आणि बी. भीषन्ना हेही निघाले. सगळेजण हेलीकॉप्टरमध्ये जाऊन बसले. हेलीकॉप्टरची पायलट एक महिला होती. तिने बुरखा घातला होता, आणि त्यावर काळा गॉगल घातला होता, त्यामुळे तिचा चेहरा तर राहोच, डोळेही दिसत नव्हते. विजया जय सिंहाला तिला कुठेतरी बघितल्यासारखे वाटले. मग आठवले, ती पायलट अफगाणिस्तानातल्या गांधारीसारखी दिसत होती.

पुढे वाचा:

http://mahaakatha.blogspot.in/2014/09/2.html

simran254

 मराठी कथा, मराठी गोष्टी ,Marathi Goshti , Marathi katha,