msanglikar

-महावीर सांगलीकर

नवरा: हॅलो मिसेस बायको, मला तुझी मुलाखत घ्यायची आहे...
बायको: आता नको, मला सिरिअल्स बघायच्या आहेत
नवरा: थोड्या वेळाने लाईट जाणार आहे, डायरेक्ट संध्याकाळीच येणार आहे. पेपर-बिपर वाचतेस की नाही?
बायको: नाही वाचत. काय असतंय त्यात वाचण्यासारखं? बाय द वे, तुम्ही कोणत्या पेपरचे पत्रकार? पुढारी?
नवरा: नाही, तरुण इंडिया
बायको: बरं, विचारा तुमचे प्रश्न...
नवरा: तू माझ्याशी लग्न केले ते तुला घरच्यांनी सांगितले म्हणून की तुला मी आवडलो म्हणून?
बायको: छे... तुमच्यात काय आहे मला आवडण्यासारखं? आई म्हणाली मुलगा बावळट दिसतोय, तू सांगेल ते ऐकेल, पसंत कर, म्हणून मी पसंत केलं तुम्हाला.
नवरा: अच्छा... म्हणजे तुझी आई आहे तर ही म्हैस माझ्या गळ्यात घालण्यामागे.
बायको: माइंड युवर लॅन्ग्वेज मिस्टर बैलोबा, माझ्या आईला कांही म्हणायचं नाही.
नवरा: सॉरी, म्हशीचा अपमान करायचा नव्हता मला.
बायको: नेक्स्ट क्वेश्चन प्लीज.
नवरा: माझ्यापेक्षा दुसरा एखादा चांगला चॉइस मिळाला असता तर काय केले असतेस?
बायको: अहो, तुमच्यापेक्षा जास्त बावळट कोण मिळाला असता मला?
नवरा: लग्नात तुला तुझ्या बापानं भरपूर कांही दिलं, पण मला फारसं कांही दिलं नाही. असे का?
बायको: तुम्हाला आशीर्वाद दिले की भरपूर....
नवरा: तू कोल्हापूरची तर मी पुण्याचा. या दोन्ही शहराच्या संस्कृतीत तुला काय फरक वाटतो?
बायको: कोल्हापूर ते कोल्हापूर... त्याची सर कधी पुण्याला येणार आहे का? कोल्हापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ यांची तुलना केली तरी कळतंय हे. कोल्हापुरी फेटा आणि पुणेरी पगडीचंच बघा... कोल्हापुरी फेटा किती रुबाबदार........

Read more at:
http://mahaakatha.blogspot.in/2014/12/blog-post_15.html

+++