msanglikar

अंजलीना ब्यांडची कथा
« on: June 04, 2014, 03:54:17 PM »
तिकडे जर्मनीत त्याची बहिण अंजली ब्यांड इंगजी हा स्पेशल विषय घेवून पदवीधर झाली. मग तिने अनेक छोटेछोटे कोर्सेस केले. ती शिवणकामही शिकली. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्याने ती टाईपरायटर चालवायला शिकली. ती टायपिंग इतक्या वेगाने करत असे की भारीभक्कम टाईपरायटर देखील कांही दिवसातच खिळखिळे होत असत. मग तिने नोकरी शोधायला सुरवात केली. तिला एका मोठ्या कंपनीत छोटी नोकरी मिळाली. पण तिचे मन कांही तिथे रमेना. ती अनेक नोक-या बदलत राहिली. पण तिला मनाजोगती नोकरी कांही मिळेना. तेंव्हा ती स्यांग ली  नावाच्या एका चीनी न्यूमरॉलॉजिस्टकडे सल्ला घ्यायला गेली. त्यासाठी तिला चीनला जावे लागले नाही, कारण स्यांग ली हा जर्मनीला नेहमी भेट देत असे. चक्क हिटलर देखील त्याच्याकडून सल्ला घेत असे. असो. स्यांग लीने  तिच्या नावात दोष असल्याचे सांगून नाव किंवा स्पेलिंग बदलायला सांगितले. त्याच्या सल्ल्यानुसार तिने आपले नाव  अंजलीना असे करून घेतले.

आणि काय आश्चर्य... कुणाला कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी तिला नोकरी मिळाली. तिला तशी नोकरी मिळावी म्हणून जर्मनीवर युद्धाचे ढग जमू लागले. वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरभरती सुरू झाली. एके दिवशी अंजलीनाने  एका जर्मन पेप्रात वाचले की जर्मन सरकारच्या मुख्यालयात स्टेनो-टायपिस्टांची भरती चालू आहे. तिने लगेच एक अर्ज अक्षरश: खरडला. (आजही हा अर्ज जर्मन सरकारच्या अर्काइव्हज मध्ये पहायला मिळतो. त्याच्यावर जोरात खरडल्याच्या खुणा आहेत.  कधी गेलात तर पाहून घ्या. असो). कांही दिवसातच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आले. ती वेळेआधी पाच मिनिटे जागेवर पोहचली. तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. ती सुंदर होती, पण . तिच्यापेक्षा खूपच सुंदर तरुणी रांगेत उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यामुळे इथे कांही आपला निभाव लागणार नाही याची तिला  पक्की खात्री झाली. ती परत फिरणारच होती, तेवढ्यात चक्क तिच्या नावाचा पुकारा झाला. दोन गार्ड तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला स्यालूट  ठोकला. ते तिला अदबीने घेवून इंटरव्ह्यू  कक्षाकडे गेले. तिथल्या वॉचमननेही तिला स्यालूट ठोकला आणि तिच्यासाठी अदबीने कक्षाचे दार उघडले. तिला कळेनाच की हे लोक आपल्याशी एवढ्या अदबीने का वागत आहेत. त्या विचारातच ती कक्षात शिरली आणि तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारच उरला नाही

पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post_4.html