marathiadmin

पर्वती  ( Parvati )

पर्वती ही पुणे शहरातील मध्यभागात असलेली टेकडी आहे.
पर्वती नगारखाना

पुण्याच्या इतिहासातील बर्‍यावाईट असंख्य घडमोडींची ही टेकडी साक्षीदार राहिली आहे. नानासाहेब पेशवे यांनी पर्वती मंदिराची इ.स. १७४९ मध्ये स्थापना केली. या टेकडीची उंची जवळपास २१०० फूट (६४० मी) आहे

चतुःशृंगी

विशेष माहिती    http://www.chattushringidevasthanpune.org/

चतुःशृंगी पश्चिम पुणे येथील एक देवीच्या देवळाचे नाव आहे. हे देउळ याच नावाच्या टेकडीवर आहे.

विशेष माहिती    http://www.chattushringidevasthanpune.org/

शनिवार वाडा ( Shanivar Wada )

शनिवार वाडा श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी बांधला. त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वत: लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, १७३२ रोजी पूर्ण झाले.

हा वाडा बांधण्यासाठी हीच जागा निवडण्यासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाही पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्‍यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.

जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होऊ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहिले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात.

कात्रज स्नेक पार्क

The Katraj Snake Park Located in pune on pune - satara road. The Katraj Snake Park has a collection of reptiles, birds and turtles. Naturalists would delight in the Park's exhibits and activities. The park has also recently added a zoo
सिंहगड

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पुण्याच्या नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्‍यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो
मी मराठी


simran254

 आपला महाराष्ट्र आणि त्याची माहिती ,Aapala Maharashtra aani tyachi mahiti,