Chota Kavi

'निसर्गरम्य बनेश्वर व तेथील शिवालय' (पुणे)

हिरवे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी डोंगरकुशीतील एखाद्या शांत शिवालयाच्या शोधात असाल तर, पुण्याजवळच्या बनेश्वरला जा. डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या गर्द वृक्षराजीत, पुण्याजवळील नसरापूर गावाजवळ हे शिवालय वसले आहे. एक दिवसाच्या कुटंुब सहलीसोबतच टेकर्ससाठीही हे ठिकाण सोयीचे आहे. बनेश्वर पुण्यापासून दक्षिणेला सातारा हायवेवर सुमारे ३५ किलोमीटरवर आहे. मंदिराभोवती दाट बन, म्हणजेच जंगलझाडी आहे. त्यामुळेच या शिवालयाला 'बनेश्वर' नाव मिळाले आहे. १७व्या शतकात पहिल्या बाजीरावाने हे दगडी शिवमंदिर उभारले. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे, शिवभक्तांसोबतच पर्यटकही बनेश्वरकडे आकषिर्त होऊ लागले आहेत.

मंदिराचे प्रवेशद्वार, तसेच आवारातील दिपमाळ, मोठी घंटा व स्वच्छ पाण्याची कुंडे लक्षवेधक आहेत. मंदिरातील श्री विष्णू, लक्ष्मी तसेच महादेवाच्या मूतीर् उत्तम शिल्पकृती पाहिल्याचे समाधान देतात. मंदिराच्या आवारात धर्मशाळा तसेच पायऱ्या असणारे स्वच्छ पाण्याचे खोल दगडी तळे आहे. खोलगट गाभाऱ्यात पाच शिवलिंगे आहेत.
मंदिर परिसरात विकसित केलेली बाग तसेच मंदिरामागील सुंदर धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. खोल नदीत असणारा हा धबधबा पाहण्यासाठी लोखंडी मचाणही उभारलेले आहे. पाऊलवाटेने धबधब्याजवळही जाता येते. मात्र सुरक्षेची व्यवस्था नसल्याने हा धबधबा दुरूनच न्याहाळे योग्य. नदीच्या कडेला डुलणारी उसाची शेते, स्वच्छ पाण्याने खळाळणाऱ्या नदीकाठी चरणारी गुरे, विविध जातींचे पक्षी यांचे निवांत निरिक्षण करणे एक आनंदानुभवच. टेकर्सलाही हे ठिकाण सोयीचे आहे कारण, या ठिकाणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांचा राजगड ५० तर तोरणा किल्ला ३५ किलोमीटरवर आहे.

-कसं जाणार?

पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हा गावाला जाणाऱ्या एसटी गाड्या नसरापूर फाट्यावर थांबतात. तसेच साताऱ्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्याही या ठिकाणी थांबतात. तेथून बनेश्वरापर्यंत जाण्यासाठी सहा आसनी रिक्षा तसेच खासगी जीपगाड्या मिळतात. निसर्गसौंदर्य न्याहाळत फाट्यावरून मंदिरापर्यंत चालतही जाता येईल. फाट्यावरून मंदिर तीन किलोमीटरवर आहे. तर नसरापूर गावापासून अडीच किलोमीटरवर आहे.

simran254

 महाराष्ट्र पर्यटन , Maharashtra Tourism,