रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड
किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच
सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो.
त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.
- रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे
स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि
नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव
गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही
पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि
त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप दाखवतो. पाली
गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला
देखील पावसाळ्यात भेट देणं मस्तच.