m4marathi Forum

महाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism => रानवाटा : किल्ले आणि दुर्गप्रेमी विशेष (forts in maharashtra) => Topic started by: Chota Kavi on June 22, 2012, 09:49:11 PM

Title: माळशेज घाट
Post by: Chota Kavi on June 22, 2012, 09:49:11 PM
माळशेज घाट

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणार्‍या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणं घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचं असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवं. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.


इथली खासीयत म्हणजे ’रोहित पक्षी’ फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बर्‍याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वत:च्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

माळशेज घाटातल्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससे, घोरपड, मुंगुस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणार्‍या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलिकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.
कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिसॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी पार्क करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते..

कसे जाल- पुण्याहुन नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते किंवा मुंबईहुन-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते.
(http://a6.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/418149_289940071066308_1517820568_n.jpg)
Title: Re: माळशेज घाट
Post by: simran254 on June 24, 2022, 11:54:19 AM
 महाराष्ट्र पर्यटन , Maharashtra Tourism,