sonam

दहीहंडी : Dahihandi Festival in mumbai
« on: September 06, 2012, 06:40:48 PM »
दहीहंडी हा असा उत्सव आहे .. ज्याचा थरार,रोमांच हा जगातील अनेक उत्सवान पेक्षा खूप पटीने अधिक आहे असे मला वाटते ..
जर ह्या उत्सवाला योग्य प्रसिद्धी मिळाली तर नक्कीच हा जग भर लोकप्रिय होऊ शकतो आणि काही अंशी होत पण आहे ..
फक्त युवक युवतीच नाही तर अनेक वयोवृद्ध महिला पण आपल्या कडे दहीहंडी साजरी करता ..
अनेक महिने दही हंडी साठी घेतले जाणारे प्रशिक्षण .. त्यासाठी घडणारी पथके आणि त्याचे केले जाणारे सूत्र संचालन सर्व काही नोंद घेण्यासारखे आहे ..
युरोपात काय साधे टमाटे फेकण्याचा उत्सव होतो तर त्याला जग भरातून लोक जातात ..
त्यामानाने आपले दही हंडी सारखे सण तर अनेक प्रकारे जास्त रोमांचित आहे ..
ह्या उत्सवाचे व्यापारीकरण,राजकीयीकरण झाले अशी टीका होते पण माझ्या मते त्यानेच हा उत्सव जिवंत आहे ..
आता ह्याला सुदैव म्हणायचे का दुर्दैव हा वेगळा मुद्दा आहे पण
कृष्णजन्म जरी मथुरेला झाला तरी त्याचा थरार आहे तो महाराष्ट्रातच ..