
आज गोपाळ कृष्णांची जंयती म्हणून पुर्ण भारतवर्षा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आंनदाची बाब आहे.
जे कोणी लोक आज समाज-सुधारणा म्हणत वा करत असतात त्या लोकांना खर तर गोपाळ कृष्ण हे एक आदर्श आहेत, हे या खालील विवेचनावरुन स्पष्ट होईल .
त्यावेळीचा तत्कालीन समाज ही आज सारख्या अनेक भुरसटलेल्या कल्पना धरुन बसला होता. तत्कालीन समाज एके दिवशी इंद्र देवाची पुजा करायला निघाला होता त्यावेळी गोपाळ कृष्णांनी त्या
गोपाळांना समजावले की इंद्र वगैरे कोण आपल्याला मदत करणारा काही मदत वगैरे तो करत नाही , खर तर तुम्हाला पुजा करायचीच असेल तर या गोवर्धन पर्वताची करा. कारण हाच पर्वत आपल्या गाई वासरांसाठी चारा देतो त्यामुळेच तर आपण दुधाचा व्यवसाय करतो, या पर्वतामुळेच आपल्याला लाकुडफ़ाटा भेटतो बर्याच ऒषधी वनस्पती हाच पर्वत आपल्याला देत असतो खरच इंद्राच्या परिस हा पर्वत आपली खुप खूप मदत करतो त्यामूळे त्या इंद्राची पुजा करण्यापेक्ष! या पर्वताची पुजा करणे जास्त योग्य होईल. आणी खरच त्या गावातील लोकांनी गोपाळ कृष्णांच ऎकून त्या इंद्राची पुजा करण्यापेक्ष! त्यांनी या गोवर्धन पर्वताची म्हणंजेच पर्यायाने निसर्ग पुजा करायला सुरुवात केली . आज जे पर्यावरणवाले आहेत ना त्यांना ही
गोपाळ कृष्ण हे एक आदर्श असायला हवेत.
या एका गोष्टीतुन कीती तरी गोष्टी शिकायला मिळतात , मला तरी यातुन जाणवलेल्या वा शिकायला मिळालेल्या गोष्टी पुढील प्रमाणे :१. यातून पहीली गोष्ट ही शिकायला भेटते की गोपळ कृष्णांनी एक वाईट प्रथा बंद केली तर त्यांनी तिला पर्याय म्हणून एक चांगली प्रथा ही सुरु केली. आज जे आम्ही सुधारणावादी म्हणवतो स्वताला आम्ही एकच काम करतो की सगळ्या प्रथा बंद करा असच आवाहन करत बसतो ही फ़ार मोठी चुक आहे आमची. जर एखादी वाईट प्रथा बंद करायची असेल ना तर तिला पर्याय म्हणून एक चांगली समाजमान्य प्रथा द्यायला कमी पड्तो.
२.गोपळ कृष्णांनी त्या गावातील लोकांना इतक्या चांगल्या पध्दतीने समजावले की ते लोक वर्षानुवर्षा चालत आलेली एक प्रथा त्या गावातील लोकानी एकदम बंद केली . लोकांना त्यांच्या कलाप्रमाणे आपली गोष्ट समजावण्याचे एक सामर्थ म्हणा किंवा एक कला म्हणा जी गोपळ कृष्णांनकडॆ हॊती त्या कलेचा आज आम्हा सुधारणावादी लोकांच्यात खूप मोठा आभाव आहे आम्ही स्वत:ला सुधारणावादी लोक कोण्त्या पध्द्तीने या समाजाला समावत आहोत या बद्द्ल एकदा चिंतन केले पाहीजे अस वाटु लागल आहे. आज आम्हा सुधारणावादी लोकांना हा समस्त समाज एक फ़ोडाफ़ोडी करणारी टॊळी या नजरेने पाहू लागला आहे . ( मी फ़ेसबुक वर इतके ग्रुप पाहीले की तिथे स्वत:ला सुधारणावादी म्हणून घेणारे बरेच महाशय इतक्या अभद्र शब्दात बोलत असतात की काय ते शब्द इथे लिहणे ही अवघड आहे. आम्ही स्वत:ला सुधारणावादी म्हणूवून घेतो , जे काही खरी माहीती आम्हालाच आहे असा दावाही करतो पण हेच विसरतो की "जे जे आप णास ठावे ते ते इतरास द्यावे ! शहाणे करुन सोडावे अवघे जण !!" याप्रमाणे चांगल्या पध्दतीने समोरच्या व्यक्तीला समजावण्यापेक्ष! त्याची आई बहीण काडतो. एखाद्याला {विरोधी विचाराच्या) आई बहीणी-वरुन शीवी देणे म्हणजे सुधारणावाद का? हीच का सुधारणा? हाच प्रश्न मला भेड्सावत असतो. मला तरि आठवत नाही की आजपर्यत जे कोणी सुधारणावादी झालेत त्यांनी कधी ही विरोधकांना असल्या खालच्या पातळी वरच्या शिव्या नाही दिल्या. मला ही नेहमी वाट्त की खरच आम्ही सुधारणावादी आहोत की ढोंग करतो आहोत ?असे विचार येतात मनात माझ्या.)
३.गोपळ कृष्णांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या सगळा समाजाला बरोबर घेऊन ना की आपली आपली माणस वेगळी काढली.त्यांच्या मागे प्रत्येक समाजातील माणूस होता अगदी सुदामा ही. पण आम्ही सुधारणावादी आज सगळ्याच एका विशीष्ट समाजाला(ज्याला आम्हा सुधारणावादी म्हणूवऊन घेणार्या लोकांचा विरोध आहे असा वर्ग) नाकारत आहोत ही एक मोठी चुक आहे आमची. आज एखाद्या त्या विशीष्ट समाजातील जर हुशार लोकांना जर वाट्त असेल की ही ज्या काही गोष्टी होत आल्या आहेत ती चुकीची आहे अशी त्यांची भावना असेल , त्यांना ही जर सुधारणा कराव्यात असे वाट्त असेल तर एक विरोधाला विरोध म्हणुन त्यांना सामावुण न घॆणे याला काय म्हणाव ? खरच आम्ही आगरकर ,बाबासाहेबांचा अपमान तर नाही ना करत?
असे बरेच मुद्दे आहेत पण आता सध्या वेळ ही नाही जास्त लिहायला परत कधी तरी आम्ही नक्की लिहू यावर . पण वर जे मी मुद्दे लिहले आहेत ते नक्किच एका खरया सुधारणावाद्याला नक्की आवडतील अशी आशा बाळगतो . आणी परत एकदा सुधारणावादाचा जनक वा एक आदर्श असणारया गोपाळ कृष्णांच्या चरणी विनम्र अभिवादन करुन थांबतो .........................विवेक सिद.
( विचार कसा वाट्ला नक्की कळवा, काही चुका असतील तर त्या ही कळवा स्वागत असेल, वाट पाहतोय)