-महावीर सांगलीकर
नावात काय आहे? असे शेक्सपियरने म्हंटले होते. पण त्याचे हे म्हणणे विशिष्ट संदर्भात होते. प्रत्यक्षात नावात बरेच कांही आहे.
कांही नावे ऐकायला गोड वाटतात, तर कांही नावे ऐकायला नकोशी वाटतात. नावावरून त्या व्यक्तीची बरीच माहिती उघड होवू शकते, जसे त्याचा भाषिक समूह, प्रांत, जात, सामाजिक दर्जा, आणि ब-याचदा धर्म देखील. नावारून जात शोधण्याचा प्रकार तर भारतात फारच मोठ्या प्रमाणावर चालतो.
नाव ही त्या-त्या व्यक्तिची पहिली आणि सगळ्यात महत्वाची ओळख आहे. प्रत्येकाच्या नावाचा विशिष्ट अर्थ असतो. त्या नावाला पार्श्वभूमीही असते. नाव हा त्या व्यक्तीचा ब्र्यांड असतो. नावाशिवाय एखादी व्यक्ति असू शकत नाही. आपले नाव आकर्षक, ऐकायला गोड वाटणारे असणे हे फार महत्वाचे असते. तुमच्या नावातील स्वर आणि व्यंजने, त्यांची संख्या आणि प्रमाण यावर तुमच्या नावाचा गोडवा अवलंबून असतो.
न्युमरालॉजीमध्ये नावाला जन्मतारखेसारखेच महत्व आहे. एखादे नाव आपल्याला प्रचंड यश मिळवून देवू शकते, तर एखादे नाव आपल्या कामात अडथळे निर्माण करू शकते. आपण आपली जन्मतारीख बदलू शकत नाही, पण नाव बदलू शकतो, एखाद्या नावात दोष असेल तर न्युमरालॉजीस्ट ते नाव बदलण्याचा अथवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात. न्युमरालॉजीमध्ये नावाच्या प्रत्येक अक्षराला महत्व आहे, कारण प्रत्येक अक्षर हे विशिष्ट गुण आणि दोष याचे द्योतक असते. नावातील किंवा स्पेलिंग मधील बदल हा जन्मतारखेशी सुसंगत असावा लागतो.
तुम्ही जेंव्हा नाव बदलता, तेंव्हा आधीच्या नावाचे वलय कांही एका दिवसात नष्ट होत नसते. नाव बदलल्यानंतरही आधीच्या नावापासून लगेच सुटका होत नाही. त्यामुळे नंतर नाव बदलण्यापेक्षा मुळातच नाव ठेवतेवेळी ते योग्य असे ठेवणे हे जास्त चांगले असते. मग ते व्यक्तीचे असो, संस्थेचे असो कि उद्योगाचे असो.
http://numerology-marathi.blogspot.in/Email:
[email protected]