-महावीर सांगलीकर
अंकशास्त्रात जन्मतारखे इतकेच नावालाही महत्व आहे. जन्मतारखेवरून जन्मांक आणि भाग्यांक काढला जातो, तर नावाच्या इंग्रजी स्पेलिंग वरून नामांक काढला जातो. नामांकाला जन्मांक आणि भाग्यांक यांच्याइतकेच महत्व आहे.
एखाद्या व्यक्तीच्या नावाचा आणि नामांकाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर बर-वाईट परिणाम होत असतो. त्याच बरोबर एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे हे देखील फार महत्वाचे असते. जसे एखाद्या रेल्वेगाडीला इंजिन महत्वाचे असते, तसेच नावाचे पहिले अक्षर महत्वाचे असते. इंजिन शिवाय जसे इतर डब्यांना महत्व उरत नाही, अगदी तसेच नावातील पहिले अक्षर काढून टाकले तर त्या नावाला अर्थ रहात नाही.
एखाद्या व्यक्तीच्या केवळ नामांकाचा विचार करण्या ऐवजी नावाच्या आणि आडनावाच्या पहिल्या अक्षराचा विचार करणे महत्वाचे ठरते.
तुमच्या नावाचे पहिले अक्षर इंग्रजी मुळाक्षरात कितव्या नंबरला आहे त्यावरून तुमच्या व्यक्तीमत्वाची साधारण कल्पना येऊ शकते. अंकशास्त्रात त्या नंबरचे जे गुणदोष असतात, तेच तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराचे असतात. जसे, जर तुमचे नाव A या अक्षराने सुरू होत असेल तर तुमचे व्यक्तिमत्व जन्मांक 1 चे अनेक गुणदोष घेऊन बनलेले असते, कारण A या अक्षराचा अंक 1 आहे.....
पुढे वाचा:
http://numerology-marathi.blogspot.in/2015/02/blog-post_20.html