Manasi



प्रल्हाद केशव अत्रे
पूर्ण नाव    प्रल्हाद केशव अत्रे
जन्म    ऑगस्ट १३, १८९८
सासवड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू    जून १३, १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र    साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट
राष्ट्रीयत्व    भारत ध्वज भारतीय
भाषा    मराठी
साहित्यप्रकार    कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती    डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी (आत्मचरित्र)
अपत्ये    शिरीष पै, मीना देशपांडे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, १८९८ - जून १३, १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणत़ज्ज्ञ, राजकारणी, वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

 
 पत्रकारीता

१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ 'रत्नाकर' व १९२९ साली 'मनोरमा' ही मासिके सुरू केली. पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

चित्रपट

१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

पुस्तके

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

 नाटके

    * साष्टांग नमस्कार
    * पराचा कावळा
    * गुरुदक्षिणा
    * वीरवचन
    * एकच प्याला
    * लग्नाची बेडी
    * कवडीचुंबक
    * उद्याचा संसार
    * भ्रमाचा भोपळा
    * तो मी नव्हेच
    * मोरूची मावशी
    * घराबाहेर
    * पाणिग्रहण
    * जग काय म्हणेल?
    * डॉक्टर लागू


 काव्य

    * झेंडूची फुले
    * गीतगंगा


कथासंग्रह

    * कशी आहे गम्मत
    * कावळ्यांची शाळा
    * बत्ताशी आणि इतर कथा
    * अशा गोष्टी अशा गंमती
    * फुले आणि मुले


--------------------------


 आत्मचरित्र

    * कर्‍हेचे पाणी - खंड एक ते पाच


 कादंबरी

    * चांगुणा
    * मोहित्यांचा शाप


 इतर

    * अध्यापक अत्रे
    * वस्त्रहरण
    * समाधीवरील अश्रू
    * दलितांचे बाबा
    * विनोद गाथा
    * आषाढस्य प्रथम दिवसे
    * महापूर
    * चित्रकथा भाग-१
    * चित्रकथा भाग-२
    * इतका लहान एवढा महान
    * विनोबा
    * मी कसा झालो?
    * दूर्वा आणि फुले
    * संत आणि साहित्य
    * सूर्यास्त
    * क्रांतिकारकांचे कुलपुरुष
    * महाराष्ट्र कालचा आणि आजचा
    * सिंहगर्जना
    * हंशा आणि टाळ्या
    * मुद्दे आणि गुद्दे
    * केल्याने देशाटन
    * हुंदके
    * सुभाष कथा
    * मराठी माणसे, मराठी मने
----------------------------------------------------------
महाराष्ट्राच्या मराठी मातीशी अतूट नाते सांगणारे अनेक दिग्गज चारित्र्यसंपन्न लेखक महाराष्ट्रात होऊन गेले. प्रत्येकाच्या लेखनशैलीची जातकुळी भिन्न होती. सभोवताली दिसणार्‍या अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आसूड उगारणार्‍या जातकुळातील असेच एक भन्नाट व्यक्तिमत्त्व म्हणजे प्र. के. अत्रे. मंतरलेले दिवस या पुस्तकामधून अत्र्यांच्या सहवासातील मंत्रमुग्ध करणार्‍या दिवसांचे वर्णन करतानाच अत्र्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार व संपादक मधुकर भावे यांनी केला आहे. ‘मराठी’ वृत्तपत्रामध्ये काम करत असताना राज्यांचा शाब्दिक झंझावात, राजकारणावरील टीका, भ्रष्टाचाराविरोधातील लेख स्वतःला पटेल तेच लिहिण्याची त्यांची हातोटी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान इत्यादी विविध विषयांच्या माध्यमातून मधुकर भावे यांनी अत्रे यांच्याबद्दल वाचकांना माहिती करून दिली आहे. अत्रे यांच्या प्रती अत्यंत आदर असल्यामुळे आपण पत्रकार झालो तो केवळ यांच्यामुळे ते सांगताना भावे लिहितात, पत्रकारितेची मूळाक्षरे आचार्य अत्रे यांच्यामुळेच गिरवता आली. चार ओळी लिहिता आल्या, सभा, सं ेलने पाहता आली. देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांना पाहता आले, भेटता आले, बोलता आले... हे काही एका जन्मीचे पुण्य असेल असे मी .

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अत्रे हे सेनापती होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिजून गाठला. ‘मराठा’तील अग्रलेख तसेच वेगवेगळ्या सभां धील भाषणांच्या माध्यमातून तरुणांना या लढ्यासाठी चेतविण्याचे काम केले. त्यातूनच केंद्राला मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्राची निमित्ती करण्यास भाग पाडले; परंतु बेळगाव तसेच त्या लगतचे इतर मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात विलिन करण्यात न आल्याची खंत मात्र शेवटपर्यंत अत्र्यांच्या मनात घर करून राहिली.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अत्र्यांच्या योगदानासाठी मधुकर भावे यांनी त्यांना कृष्णाची उपमा दिली आहे. कृष्णाने जसा गोवर्धन पर्वत करंगळीवर धरला. सगळे सामर्थ्य करंगळीत होते. तसे सामर्थ्य आचार्याच्या लेखणीत होते. गोवादेखील महाराष्ट्रात विलिन व्हावा असे अत्रे यांना वाटत होते. त्यासाठीसुद्धा त्यांनी लेखणीच्या माध्यमातून चळवळ उभी केली. अग्रलेख लिहिण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. यासंबंधी भावे अनुभव सांगतात. गोवा विलिनीकरणासंबंधी झालेल्या सभेचा अग्रलेख लिहिल्यावर अग्रलेखाचे शीर्षक भावे यांनी ‘मांडवी तीरी प्रचंड गर्जना- जिथे मुंबई तिथे गोवा’ असे दिले; परंतु अत्र्यांनी ते शीर्षक बदलून ‘पणजीत आचार्य अत्रे यांची पंडित नेहरूंपेक्षा विराट सभा’ असे केले. देशातील वेगवेगळ्या नेत्यांच्या राजकीय सभा, अधिवेशने नेत्यांची भाषणे, साहित्य सं ेलने यासाठी अत्रे यांची तेजस्वी लेखनी ‘मराठा’साठी नेहमी सज्ज असे. अत्र्यांच्या सहवासात वावरताना मधुकर भावे यांना जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक कडू-गोड प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु अत्रे साहेबांचा शब्दाचा आधार त्यांना लाख मोलाचा वाटे. अत्र्यांनी आपल्या अग्रलेखातून त्यांना भावलेल्या व्यक्तीला काही पदव्या बहाल केल्या. वि.दा. सावरकर- स्वातंत्र्यवीर, नाना पाटील- क्रांतीसिह, दत्तो वामन पोद्दार- महामहोपाध्याय, म्हादबा मेस्त्री -यंत्रमहर्षी, या पदव्या आजही महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेल्या आहेत. तर अत्र्यांना आचार्य ही पदवी सावरकरांनी दिल्याचा उ.ेखही या पुस्तकात आहे. अत्रेनी कधीही लिहिलेला शब्द खोडला नाही आणि दिलेले वचन कधी मोडलेले नाही, यांचे प्रत्यंतर भावेना आले होते. प्र.के. अत्रे यांनी प्रचंड साहित्य निर्मिती केली. त्यांचे लेखन हे बहुतांशी मिश्किल व विनोदी असे. असे असले तरी वरवर कठोर वाटणारे अत्रे आतून कुठे तरी दुःखी असावेत असे भावे यांना वाटत असावे. म्हणूनच अत्रे कसे आहेत? त्यांचे मन कसे आहे हे कुणाला कळलेच नाही. असा उ.ेख बर्‍याच वेळा या पुस्तकामध्ये भावे यांनी केला आहे. अत्र्यांचा अध्यात्माचा व्यासंगही दांडगा होता. आध्यात्मिक लिखान करताना त्यांची लेखनी वारकरी तंत्र धारण करायची. आपल्या ध्येयाच्या परिपूर्ततेसाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी असे. त्यासाठी ते कोणालाही खडेबोल चारायला मागेपुढे पाहत नसत. म्हणूनच अत्र्यांना गुरूस्थानी असलेल्या विनोबा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात निवेदन केले. तेव्हा अत्र्यांनी ‘विनोबा की वानकोबा’ असा तिखट अग्रलेख लिहिला. पण नंतर मात्र त्यांनी विनोबांची माफी मागितली.

अत्र्यांच्या लेखणीला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. शाहीर अमर शेख यांची डोंगर शेते माझं ती बेलू किती, माझी मैना गावावर राहिली ही गीते अत्र्यां ुळेच प्रसिद्ध झाली. श्रेष्ठ दर्जाचा चित्रपटकार तसेच नाटककार म्हणून सार्‍या महाराष्ट्राला अत्रे परिचित आहेत. त्यांच्या मराठाचा धाक विलक्षणच होता. मराठाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फुटत असे. राजकारणी लोकांची गुपिते उघड होत असत. नाशिकमध्ये कळवण तालुक्यात फादर फेररने लोकांना आमिष दाखवून धर्मांतर केल्याची बातमी तसेच पाकिस्तानचा हेर अजिज उल-इस्लाम व्हिसा नसताना भारतात परत आला. या बातम्या मराठानेच सर्वप्रथम दिल्या. अत्र्यांच्या मराठामध्ये महाराष्ट्राचे हित दडलेले होते. १३ जून १९६६ रोजी महाराष्ट्राला सदैव दिशा दाखविणारा झंझावात कायमचा बंद झाला. अत्रे यांचा काविळीच्या आजाराने मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात सर्व समस्यांची खडा न् खडा माहिती ठेवणार्‍या या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा अस्त झाला.

खरा वारसदार!   लोकसभा झाली आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. जगातली सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशात खरोखरच लोकशाही कधी, कशी अवतरेल हा एक डोंगरायेवढा प्रश्न उभा ठाकतो. कारण लोकशाहीने आपल्याला खरोखरच काही फायदे दिले की नाहीत की सत्ताधिशांच्या थैलींपुढे लोकशाही नावाची यंत्रणा चिरडून ठार झालीय? अर्थात याचे उत्तर काळच देईल पण महाराष्ट्रातल्या जनतेला बदल हवाय. परिवर्तन हवय. नव नेतृत्व हवय. ही गोष्ट मात्र लपून राहिलेली नाही.

हा बदल म्हणतांना पावसाळी छत्र्यांप्रमाणे अनेक वारसदार उभे ठाकले आहेत. बदल माणसांचा हवाय की विचारांचा? बदल मनोवृत्तीचा हवाय की केवळ खुर्च्यांचा? याची उत्तरे संमिश्र मिळतील पण बदलाची प्रक्रिया एका दिवसात उगवत नाही. त्याला बरीच वर्षे जावी लागतात. तळपत्या आगीतून जावे लागते. संकटांचा मुकाबला करून श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. तेंव्हाच खर्‍या अर्थाने बदलाला अर्थ निर्माण होतो...

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, दिनाबामा पाटील या कामगार नेत्यांचे पुत्र संजय पाटील, नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक. एक ना दोन यादी अपूर्ण राहील. आता तर प्रत्येक गल्याबोळात ‘खरा वारसदार’ म्हणून एकेक जण उभे ठाकत आहेत. रक्ताची नाती ही सत्तेच्या नात्यापर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नात आहेत. काहीजण जरुर विजयी झालेही पण बाप आमदार म्हणून पोरगाही आमदार झालाच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी! स्वकर्तुत्वावर, जनसेवा करून जर कुणी आमदार झाला तर त्याचे स्वागतच आहे. पण स्वार्थी वारसदारांची यादी बघितली की उबक येतो. संताप येतो. .

महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. याचे भान नेत्यांना आहे का? हा माझा जाहीर सवाल आहे. बारा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. हा सरकारी ‘आकडा’आहे! महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोरगरीब जनतेचे जीणे हराम बनलय. महाराष्ट्र एकेकाळी नंबरवनचे राज्य म्हणून ओळखले जात होते. पण आज शेवटचा नंबर आहे. काँग्रेसी संस्कृतीने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड ब्रेक केले. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार याचे थै ान महाराष्ट्रात सुरू आहे पण त्यावर गंभीरपणे लक्ष देण्याऐवजी सत्तेची उब आपल्या घरात कशी काय सुरक्षित राहील याकडे राज्यकर्ते प्रामुख्याने लक्ष देतात.

शेतकर्‍यांना मोफत वीज देणारच! एक कोटी रोजगार उपलब्ध करणारच! बंद गिरण्या चालू होणारच! महिलांना नोकर्‍यात ३३* आरक्षण देणारच! कापसाला, उसाला चांगला भाव देणारच!! अशी शेकडो आश्वासने या सत्ताधारी नेत्यांनी दिलीत. शब्द पाळण ही यांची संस्कृती कदापि नाही आणि नव्हती. कहर म्हणजे दहशतवादी हल्ल्याच्या भयानक घटनेनंतर मुख्यमंत्री महोदय मुलाला आणि निर्मात्याला ताजमहाल हॉटेलची भटकंती करण्यासाठी घेऊन जातात. हे स्थळ जणू पर्यटनस्थळ आहे अशा पद्धतीने बघितले जाते. हे मराठी मतदारांचे दुर्देव आहे. महाराष्ट्रात मुंबई असूनही ‘बॉम्बे’ म्हणण्यात धन्यता मानली जाते. मराठी ऐवजी हिदी भाषेचा सर्रास वापर करण्यात येतो या पवित्र मातीबद्दल, भाषेबद्दल, माणसांबद्दल जराही जिव्हाळा राज्यकर्त्यांना राहिलेला नाही. हे कसले डोंबल्याचे सरकार? या गदारोळात मराठी माणसाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न घेऊन नव्या दमात जनतेचा खरा वारसदार वेगाने निघालाय. तो वारसदार आहे. माननीय राजसाहेब ठाकरे!

गेल्या चाळीस एक वर्षात मायमराठी भाषेसाठी तुरुंगवास भोगणारे राजसाहेब हे एकमेव नेते आहेत. आज मराठीच्या आंदोलनात त्यांच्यावर एैशीएक गुन्हे दाखल झाले आहेत. मराठी तरुणांच्या हक्कासाठी कुठलीही पर्वा न करता रस्त्यावर उतरणारे ते एकमेव नेते आहेत. मतांसाठी मराठी जनांना जवळ घेऊन सत्ता येताच त्यांना वार्‍यावर सोडणारे राजकारणी बरेच आहेत. पण राजसाहेबांनी दिलेला शब्द हा जपला. त्यांचे शब्द जणू शस्त्र बनले. आणि एक इतिहास उभा करण्यासाठी ते नव्या दमानं निघाले आहेत. त्यांना साथसोबत करण्याचे भाग्य आम्हांला मिळालं.

गुणवत्ता ठासून भरली असतांना महाराष्ट्राचा विकास का झाला नाही? सर्वच क्षेत्रात चांगली माणस असूनही महाराष्ट्र आदर्श ठरू का शकला नाही! छत्रपती शिवरायांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे युगपुरुष महाराष्ट्रात असूनही आपण चार पावलं मागे का पडलो?

महाराष्ट्र राज्य म्हणजे स्वाभिमानाचे प्रतिक होते पण दिल्लीपुढे लोटांगणे घालण्यात आज धन्यता का वाटते? मराठीचा मुद्दा आमचाच होता. तो मनसेने चोरला असे म्हणणारे पालिकेत सत्ता असूनही दुकानांवर मराठी पाट्या का लावत नाहीत? भर मुंबईत शेकडो बेकार असतांना रेल्वेपासून हॉटेलापर्यंत परप्रांतीयांना नोकर्‍या का मिळतात? मराठी तरुण बेकार का राहातो? प्रश्न आणि प्रश्न! महाराष्ट्र राज्य यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी म्हणून साजरं करीत आहे. पण गेल्या पंन्नास वर्षात मराठी माणूस खरोखरच समाधानी आहे काय? आज सार्‍यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीय. त्यासाठी राजसाहेब हेच एकमेव मराठी माणसाचे खरेखूरे वारसदार आहेत... आशास्थान आहेत. एका मराठमोळ्या  झंझावाताला मानाचा मुजरा!

simran254

 मराठी नाट्य संगीत,Marathi Natya Sangeet, Marathi  Sangeet,मराठी  संगीत,