Manasi

विष्णुदास भावे
 -------------------------------------------------
पूर्ण नाव    विष्णुदास अमृतराव भावे
जन्म    १८१९
मृत्यू    ऑगस्ट ९, १९०१
कार्यक्षेत्र    नाटक
राष्ट्रीयत्व    भारतीय
भाषा    मराठी
साहित्यप्रकार    नाटक

विष्णुदास अमृतराव भावे (१८१९ - ऑगस्ट ९, १९०१) हे मराठी नाटककार होते. ते आधुनिक मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.
 

 जीवन

विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली.१८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक उभारले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
 
  नाटके
नाटक             वर्ष (इ.स.)      भाषा     सहभाग
सीता स्वयंवर    १८४३        मराठी    लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद    १८५४        हिंदी    लेखन, दिग्दर्शन
---------------------------------------------------------------------
विस्तारित माहिती
------------------------------
सांगलीचा नाट्यक्षेत्रात फार मोठा दबदबा होता. येथील नाट्य रसिकांनी नाट्याची चळवळ जोपासली. मराठी रंगभूमीचे जन्म स्थान म्हणून सांगली शहर परिचित आहे. विष्णुदास यांनी १८४३ मध्ये राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठातील पहिले नाटक `सीता स्वयंवर' साकारले. त्यानंतर पहिली सांगलीकर नाटक मंडळी आकारली. १८५४ मध्ये विष्णुदासांनी `राजा गोपीचंद' हे हिंदी नाटक साकारले आणि ते हिंदी रंगभूमीचे जनक म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांनी एकूण ५२ नाटके लिहिली. त्यात प्रामुख्याने पौराणिक नाटके आहेत.

कर्नाटकातील भागवत मंडळी यांचा `खेळ' पाहून सांगलीचे संस्थानिक थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपल्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे यांच्या विष्णू या बुद्धिमान मुलाला भागवत नाटक मंडळीतील नाटकाप्रमाणे खेळ करण्याची आज्ञा केली. त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर'नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार ` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. यावेळी खुद्द विष्णुदासांनी `नाट्यकवितासंग्रह' या नावाने १८८५ मध्ये संग्रहित केले.`सीतास्वयंवर' मराठी रंगभूमीवर आले तो दिवस होता ५ नोव्हेंबर १८४३ चा.म्हणूनच हा दिवस नाट्यपंढरीत `मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो.

५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदासांनी `सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला.पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळकरीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटार्‍या त पडून राहिल्या होत्या व भावे यांच्याकठपुतळी खेळाच्या तीनचार संहिता उपलब्ध आहेत. द्रौपदी स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे आणि कठपुतळ्या या लाकडी असल्यातरी अतिशय हलक्या होत्या. शक्यतो उंबराच्या लाकडाचा व कागदाचा लगदा या पासून बनविल्या जात. रेखीव आकार, प्रमाणबध्दता असूनही त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोंखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोही प्रकारे खेळवता येतात.

विष्णूदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. तेथे प्रेक्षकांनी या नाटकांना रसिकतेने राजाश्रयानंतर लोकाश्रयला `सांगलीकर नाटककार मंडळी' फिरतीवर निघाली.१८४३ साली मुंबईच्या दौर्‍यापासून या सांगलीकर मंडळीनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरु केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करुन १८५१ ते १८६२ सालापर्यत एकूण सात दौरे केले. १४-२-१८५३ साली झाला प्रथमच वृत्तपत्रातून जाहिराती आल्या. मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच गोपीचंद या हिंदी नाटकाचा प्रयोग १९५४ मध्ये झाला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदासांचे नाव झाले. त्याचबरोबर सांगलीचे नाव अखिल भारतात गाजले म्हणूनच असेल सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली. या विष्णुदासांनी एकूण ५२ नाटके लिहिली. यांची सर्व नाटके पौराणिक होती. नाटक मंडळीत पुढे १८६२ सुमारास विष्णुदासांनी नाट्य संन्यास घेतला. पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटकमंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णूदास भावे यांच्या पध्दतीची नाटके १९१० सालापर्यत चालू होती. ९ ऑगस्ट १९०१ साली नाट्याचार्य विष्णुदास अमृत भावे यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने भावे पुरस्कार ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनादिवशी देण्यात येतो. त्याच्या नावाने सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिर उभारले आहे. नाटक कंपनीने नाटक बसविले की त्याचा पहिला प्रयोग या नाट्यपंढरीच्या विष्णुदास भावे रंगमंचावर करायचा ही प्रथाच पडून गेली आहे. नाट्यपंढरीबद्दल सर्वच नाट्य रसिकांना मनोमन आदराचे स्थान आहे.Manasi

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ( अण्णासाहेब किर्लोस्कर )


 
बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
पूर्ण नाव    बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
जन्म    मार्च ३१, १८४३
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
मृत्यू    नोव्हेंबर २, १८८५
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
अन्य नाव/नावे    अण्णासाहेब किर्लोस्कर
कार्यक्षेत्र    नाटक
राष्ट्रीयत्व    भारतीय 
भाषा    मराठी, कानडी
प्रमुख नाटके    संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर (मार्च ३१, १८४३ - नोव्हेंबर २, १८८५) मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते.
 
 उल्लेखनीय
 मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक "संगीत शाकुंतल" लिहून अण्णासाहेबांनी १८८० साली संगीत नाटकांची परंपरा सुरु केली.

कार्य

अण्णासाहेब किर्लोस्करांनी पाच नाटके लिहीली:
नाटक    प्रकार    साल
अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी    एकांकीका, अपूर्ण फार्स    १८७३
शांकर दिग्जय    गद्य नाटक    १८७३
संगीत शांकुतल    कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम' चे भाषांतर    १८८०
संगीत सौभद्र    सात अंकी संगीत नाटक    १८७३
संगीत रामराज्यवियोग    तीन अंकी - अपूर्ण संगीत नाटक    १८८४, १८८८