jyotish jagat

विष्णूच्या २४ प्रतीमा (मुर्ती)-
भारतीय शिल्पशास्त्रातील एक खासियत जी मला खूप आवडते ती म्हणजे भव्य-दिव्य गोष्टी करतांना लहान गोष्टींकडे दुर्लक्ष न करणे उलट लहान गोष्टींनाही तितकेच महत्व देणे. आपल्या भारतीय पुर्वाचार्यांनी अनेक मोठी भव्य मंदिरे बनविली. राजवाडे, मोठ्या इमारती, मोठमोठी शिल्पे साकारली तसेच त्यांनी सुक्ष्म कलाकुसरीही केल्या. मोठ्या गोष्टी करतांना लहान गोष्टींना ’चालवून घ्या’ हे धोरन न ठेवता त्यांनाही तितकेच महत्व दिले. एखादी मुर्ती किंवा प्रतिमा बनवितांना त्यांनी अनेक गोष्टींवर खूपच बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक देवतेच्या मुर्तींचे प्रमाण ठरविले आहे. मुर्ती किती उंच असली कि, त्याचे मुख किती आकाराचे असावे, बाहु, पाय, डोळे इ. गोष्टींचे प्रमाण ठरलेले आहे. यावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. अशीच एक वाचनात आलेली रंजक माहीती आपल्यासमोर ठेवत आहे. विष्णूच्या मुर्तींचे २४ प्रकार सांगितले आहेत. विष्णूची चतुर्भूज मुर्ती बनवितांना ४ हातात ४ आयुधे येतात यांचा केवळ क्रम बदलून २४ प्रकारे या मुर्त्या बनविता येतात. या प्रत्येक मुर्तीला वेगळे नांव आहे.
विष्णुंच्या मुर्तींचे २४ प्रकार सांगितले आहेत. ते असे उजवा खालील (समोरचा) हात, उजवा वरचा (मागील) हात, डावा वरचा (मागील) हात, डावा खालील (समोरचा) हात याप्रमाणे क्रम समजावा. * अभयमुद्रेतील (आशिर्वाद देत असलेला) हाताथी कमळ असतेच, नसेल तर त्या हातात पद्म समजावे.
संपूर्ण लेख खालील लिंकवर वाचा .....

http://www.jyotishjagat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE/

simran254

 मराठी भाषा,Marathi bhasha,आपली माय मराठी,Aapali Maay Marathi,