jyotish jagat

सहदेव भाडळी
« on: January 17, 2018, 08:00:56 PM »
सहदेव भाडळी
           पैठण येथील ‘मार्तंड जोशी नावाच्या एक ब्राह्मण ज्योतिष्याला अंत्यज (शूद्र) स्त्रीपासून झालेली एक विद्वान कन्या भाडळी, तिच्या सहदेव नावाच्या सावत्र भावाच्या नावासकट "सहदेव भाडळी" या नावाने ओळखली जाते.

       सहदेव भाडळी हा ग्रंथ बाराव्या शतकात रचला गेला आहे, यात अनेक प्राणी/पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज कसे करतात याचे पारंपरिक वर्णन आढळते. पूर्वी समाजाचा प्रत्येक घटक हा, ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊसपाणी कसे होईल, येते वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी सहदेव भाडळीचा आधार घेत असे. सहदेव भाडळी ही कला मूलत: पर्जन्यमानाच्या तर्काशी संबंधित आहे. तो लिहिताना भाडळीने पर्जन्य विचारांवर स्वतःचे असे काही विचारही मांडले आहेत. त्याचबरोबर इतर भविष्यविषयक ज्ञानही यातून मिळते. भाडळीने संस्कृतचे बंधन तोडून प्राकृतात ज्ञाननिर्मिती केली. तिने 'मेघमाला' नावाचा व्यासांनी लिहिलेला ग्रंथ प्राकृतात आणला. तिने गांधर्व विवाह, शल्यचिकित्सा, आयविचार, पिकांवरील रोग व त्यांवरील उपचार, आरोग्य व ज्योतिष, पर्जन्याचे हवामान शास्त्राच्या अंगाने केलेले विवेचन, स्त्री-प्रशंसा व इतरही अनेक आधुनिक बाबींचा विचार मांडला.तिच्या ज्ञानरचनेवर शाहीर हैबती घाडगे यांनी रचना केल्या व भाडळीचे ज्ञान लावण्यांच्या रूपाने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सहदेव भाडळी विषयी महाराष्ट्रात दोन कथा प्रचलित आहेत त्या अशा... ……….. संपूर्ण लेख खालील लिंकवर वाचा ........ subscribe करा ... आवडल्यास  share करा..... http://www.jyotishjagat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A5%80/