jyotish jagat

   
अधिक मास – हिंदु कालगणणेचे एक वैशिष्ट्य
            यावर्षीच्या पंचांगावर नजर टाकल्यास लक्ष्यात येईल की, हे मराठी (हिंदू) वर्ष १३ महिन्यांचे आहे. यात ज्येष्ठ  अधिक मास म्हणून दिला आहे, व या अधिक मासामुळेच होळी-गुढी पाडवा  हे सण जरा लवकर आले व आता वट पौर्णिमा, श्रावण यापुढचे सर्व सण जरा उशीरा येत आहेत. तर हा अधिक मास काय असतो? तो कसा येतो ? व त्याचे महत्व काय हे पाहू.
         आपली हिंदू कालगणना ही निसर्गाशी निगडीत कालगणना आहे. ही कालगणना पूर्णपणे पृथ्वी, सूर्य व चंद्र यांच्या गतिवर आधारलेली आहे. आपल्या कालगणनेप्रमाणे एका वर्षात २ अयने, सहा ऋतू व १२ महिने होतात. आपले सर्व धार्मिक सण व प्रथा या अयन व ऋतूंवर आधारीत आहेत. ऋतूंचा मानवाच्या आरोग्यावर खूपच परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या आरोग्याचे संतुलन योग्य राखण्याचे काम आपल्या सणांद्वारे होते. अशी योजनाच आपल्या पूर्वाचार्यानी करून ठेवली आहे. ऋतू -सण-आहार असा हा मेळ घातला गेला आहे…..
           अधिक मासात कोणती कर्मे करावी व कोणती कामे करु नये या संबंधात लोकांमध्ये संभ्रम असतो. याकरीता अधिक मासात कोणती कर्मे करावी कोणती कामे करु नये या संबंधी ही माहीती.
अधिक मासात फल प्राप्तीची अपेक्षा ठेऊन करावयाची सर्व कामे वर्ज्य आहेत व फल प्राप्तीची अपेक्षारहित सर्व कामे (निष्काम) करता येतात. असा हा अधिक मास धर्मशास्त्र व पुराणात अतिशय पवित्र म्हणून वर्णिला गेला आहे…………… संपूर्ण लेख खालील लिंकवर वाचा ...... आवडल्यास शेअर करा ....... Subscribe for regular updates........ http://www.jyotishjagat.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%9A/