Manasi

गणेशोत्सव - अनंत चतुर्दशी Ganeshotsav - Aanat chturdashi


अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

गणेशोत्सव - अनंत चतुर्दशी Ganeshotsav - Aanat chturdashiपुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास:

मानाचे गणपती

पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती:

   1. कसबा गणपती
   2. तांबडी जोगेश्वरी गणपती
   3. गुरुजी तालीम गणपती
   4. तुळशीबाग गणपती
   5. केसरीवाडा गणपती