प्रत्येक सणाला स्त्रियांची भूमिका नेहमीच अधोरेखित होत असते. सगळ्याच सणाला आपला भक्तिभाव, आपुलकीची भावना नेहमी अव्वल ठरते कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण खुप निर्मळ मनाने करतो.
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. पावसाळ्याची चाहूल लागली की येणारा हा पहिलाच सण असतो. आपल्या जोडीदाराच्या उदंड आयुष्यासाठी आणि सात जन्माची सोबत मिळावी म्हणून केल्या जाणाऱ्या या पुजेबद्दल सर्व विवाहित स्त्रियांच्या मनात एक हळवं स्थान आहे. यादिवशी स्त्रीया वडाच्या झाडाभोवती धागा बांधून सात फेरे मारतात. झाडाची पूजा करून आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात. सांस्कृतिक महत्त्वाने सर्वचजणी आपल्या परंपरेची जपणुक करतात.
अधिक वाचा - सण वटपौर्णिमेचा, आनंद पतीप्रेमाचा आणि निसर्गाच्या जागृतीचा!https://goo.gl/KyySzK